सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे नगरसेवक समीर सागळे यांची बिनविरोध निवड झाली असून शहरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
नगरपालिकेच्या श्री छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी समीर उत्तम सागळे यांचाच एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी नगराध्यक्षा निर्मला आवारे यांनी समीर सागळे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, गटनेते सचिन हरणस्कर ,नगरसेवक सुमंत शेटे, तृप्ती किरवे, चंद्रकांत मळेकर, अमित सागळे, गणेश पवार, आशा रोमन, सोनम मोहिते ,सादिक परास, पद्मिनी तारू, अमृता बहिरट, देविदास गायकवाड ,अनिल पवार, परवेश शेख, वृषाली घोरपडे, रूपाली कांबळे ,आशा शिंदे ,स्नेहा पवार व नगरसेवक उपस्थित होते. निवडीनंतर भोर नगरपालिकेच्या सभागृहात रायगड ज्ञानपीठाचे मानस सचिव स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष समीर सागळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.