सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत येथे श्री भैरवनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात पार पडला.
दि १६ रोजी सकाळी ६ ते ७ यावेळेत श्रीचे अभिषेक व पूजा पार पडली. दुपारी ११ ते १२ भजन, दुपारी १२ वाजता श्रींचा जन्मोत्सव, १२.३० ते २ यावेळेत गोंधळ व कथा, सायंकाळी ४ ते ६ या वेळेत भैरवनाथ पालखी मिरवणूक, ६ ते ८ यावेळेत महाप्रसाद तर रात्री ९ ते ११ यावेळेत कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. समस्त ग्रामस्थ निंबुत यांच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला.