भोर ! आमदार थोपटेंच्या वाढदिवसानिमित्त भव्य भजन स्पर्धां : भजन स्पर्धेत ७५ मंडळांचा सहभाग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर-वेल्हा-मुळशी विधानसभा मतदारसंघातचे आमदार संग्राम थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त भोरमध्ये भजन स्पर्धांचे आयोजन केले गेले असून भजन स्पर्धेमध्ये लहान गटात १२ तर मोठ्या गटात ६३ भजन मंडळांनी सहभाग घेतला.या स्पर्धांचे उद्घाटन राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिवा स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले.
      भजन स्पर्धा अनंतराव थोपटे महाविद्यालय भोरच्या प्रांगणात दोन दिवस सुरू राहणार असून स्पर्धांचे आयोजन आमदार संग्राम थोपटे गौरव समिती भोर यांच्यावतीने करण्यात आले आहे.स्पर्धांचे पंचपदी वाघजाई माता भजनी मंडळ भोरचे ह.भ.प एकनाथ धावले, हनुमंत म्हस्के, शांताराम दानवले,नाना थोपटे यांच्यासह सहकाऱ्यांनी केले. यावेळी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष कृष्णा शिनगारे,तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,बाळासाहेब थोपटे.पृथ्वीराज थोपटे,माजी सभापती लहूनाना शेलार,उपनगराध्यक्ष चंद्रकांत मळेकर,गीतांजली शेटे,सुवर्णा मळेकर,आनंदा आंबवले, संतोष केळकर,लक्ष्मण पारठे ,नगरसेवक अमित सागळे ,गणेश मोहिते,प्रमोद थोपटे,राजेंद्र शेटे आदींसह हजारो काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top