बारामती ! त्या वानराला ना झाडावर चढता येईना...! ना पळता येईना...! कुत्र्यांनी हल्ला केलेल्या वानराला जीवदान, वानराच्या मदतीला धावले पोलीस व वनविभाग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपूल ( गायकवाडवस्ती) दरम्यान एक जखमी वानराला झाडावर देखील चढता येत नव्हते, तसेच पळता देखील येत नव्हते. अनेक कुत्रे त्याचा पाठलाग करून त्याला जखमी करत होते. ही बाब काही करंजे गावातील युवकांच्या लक्षात येताच त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्या वानराची सुटका केली. 
             करंजेपुल गायकवाडवस्ती येथे अनेक कुत्रे बराच वेळ एका वानराचा पाठलाग करत होते. तेथूनच रस्त्याने जाणारे बारामतीचे शिवसेना विभाग प्रमुख राकेश गायकवाड, रणजित हुंबरे, आण्णा हुंबरे यांच्या निदर्शनास ही बाब येताच करंजेपुल येथील सपोउनि योगेश शेलार  यांच्याशी संपर्क साधला त्यानंतर त्यांनी पश्र्चिम विभागाचे वन अधिकारी कोकाटे यांच्याशी संपर्क साधला. त्याठिकाणी त्यांनी जखमी वानराला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार करून वनविभागात सोडून दिले.
To Top