सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वाई : दौलतराव पिसाळ
आमदार मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाई येथील द्रविड हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या वाई प्रीमियर लीग या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत तालुक्याच्या विविध गावातील २०० खेळाडू सहभागी झाले होते.
आमदार मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत अंतिम सामना रंगला.या सामन्यात बावधन किलर संघाने ६ षटकांत ९८ धावा अशी दमदार कामगिरी केली. उत्तरादाखल मांढरदेवी ॲथलेटिक्स फाउंडेशनचा संघ धावा ८० करू शकला.
सुशांत शिंदे याने मालिकावीर हा बहुमान मिळविला.तर विशाल पिसाळ सामन्याचा मानकरी ठरला.
रोहित वाडकर,प्रणित पिसाळ,ऋषीराज माने, नीलेश भोसले,राजू शिर्के तन्मय चौधरी,आशु मांढरे मानव देशमाने,दिग्विजय मोहिते,प्रतीक रणपिसे,शशी कोचळे,आकाश जमदाडे, अक्षय भोसले,समीर शिंदे यांनी स्पर्धेचे संयोजन केले.पंच म्हणून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या दिनेश रजपूत यांनी कामगिरी केली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण आमदार मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत,रुपेश दौंड,राजेश गुरव,राजेश शिंदे,आनंद चिरगुटे,समाधान कदम, गोविंद इथापे,बुवा खरात, यांच्या हस्ते झाले.विजयी संघाना रुपये ५१,३१,२१ व ११हजारांची पारितोषिके व करंडक देण्यात आले. श्री.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पैलवान विलास देशमुख यांनी वाईतील आस्था अनाथाश्रमासाठी १० हजार रुपये देणगी दिली.अनिकेत कामटे यांनी सामन्यांचे समालोचन केले.दिलीप दौंड जतिन धनावडे,नितीन तरटे यांनी पारितोषिके प्रायोजित केली.