भोर बिग ब्रेकिंग ! नाझरेत ट्रॅक्टरखाली सापडून तरुणाचा मृत्यू : भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील नाझरे ता. भोर येथे शेताच्या मशागतीचे  काम करण्यासाठी गेला असताना ट्रॅक्टर घेऊन गेलेला तरुण गौरव महादेव काळे वय -२६ याचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याची फिर्याद भोर पोलिसात विष्णू विनायक खोपडे यांनी दिली  आहे.
     भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाझरे ता.भोर गौरव महादेव काळे हा शेजारील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने मशागत करण्यासाठी (रोटर मारण्यासाठी) गेला असताना ट्रॅक्टर चालवीत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन ट्रॅक्टर खाली सापडल्याने जखमी झाला होता.मात्र ट्रॅक्टर खाली सापडलेल्या गौरव काळे याला उपचारासाठी भोर येथे आणले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.गौरव हा तरुण आंबवडे खोऱ्यातील सामाजिक कार्यकर्ता असल्याने परिसरात हळूहळू व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल दवडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
To Top