सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान गुवाहटी (आसाम) येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॅरास्वीमिंग चैम्पियनशिप स्पर्धेसाठी वाणेवाडी ता.बारामती जि. पुणे येथील पॅरास्विमर अजय हिंदूराव भोसले याची निवड झाली आहे.
या स्पर्धेच्या पात्रतेसाठी नुकतीच ठाणे येथे १४ वी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्या स्पर्धेत अजय भोसले याने श्रेणीमध्ये १०० मीटर फ्रीस्टाईल या जलतरण प्रकारात रौप्यपदक मिळवून राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान नक्की केले. अजय हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असून अतिशय जिद्दीने त्याने हे यश मिळवले आहे.या यशाबद्दल त्याचे परिसरातून कौतुक होत आहे. अजय याच्या वडिलांचे निधन झाले असून अपघातात आजचा गुडघ्यापासून खाली एक पाय निकामी झाला आहे. घरच्या दीड एकर शेतावर त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.