बारामती ! आरोग्य, शिक्षण, लैंगिक समानता, समृद्ध व स्वच्छ गावासह मगरवाडी होणार गरीबीमुक्त गाव : ग्रामसभेत ग्रामस्थांचा निर्धार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मगरवाडी ग्रामपंचायत येथे पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत आमचे गाव आमचा विकास अंतर्गत सरपंच अजित सोरटे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभा पार पाडली. 
         १५ वित्त आयोग अंतर्गत आमचं गाव आमचा विकास अंतर्गत सरपंच अजित जालिंदर सोरटे यांचे अध्यक्षतेखाली ग्रामसभा आज दुपारी ४:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थित पार पडली. या ग्रामसभेमध्ये गावातील लोकांना प्राथमिक गरजांना प्राधान्य देत शिक्षण आरोग्य उपजीविका तसेच गरीबीमुक्त गाव स्वच्छ व समृद्ध गाव लैंगिक समानता या संकल्पनेचा विचार करण्यात आला व त्याप्रमाणे आराखडा तयार करण्याचे ठरले तसेच महिला व बालकल्याण अंतर्गत अंगणवाडी मधील ज्या प्राथमिक गरजास प्राधान्य देण्यात आले अनुसूचित जाती व जमाती मधील प्राथमिक गरजांना प्राधान्य देण्याचे ठरले तसेच महिलांचे प्रश्नावर ही चर्चा झाली या ग्रामसभेसाठी संग्राम सोरटे (संचालक श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना) हे प्रमुख उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तसेच गावचे उपसरपंच सोमनाथ येळे ग्राम सदस्य अमोल नाईक, सुवर्ण मगर, ललिता होळकर, अजित येळे, इशा प्रवीण सोरटे, नम्रता कोंढाळकर तसेच ग्रामसेवक सोनाली जाधव यांनी सचिव म्हणून कामकाज पाहिले या ग्रामसभेला जवळपास १३० ग्रामस्थ उपस्थित होते. या मध्ये महिला व युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. 
To Top