मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली समितीच्या पुणे जिल्हा युवा अध्यक्षपदी नागेश जाधव यांची नियुक्ती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : सुनील जाधव
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले नागेश जाधव यांची आज मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली समितीच्या पुणे जिल्हा युवा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्याची दखल घेऊन व केलेले कामाची पाहणी करून मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली या कमिटीने पुणे जिल्हा अध्यक्ष या पदावर श्री नागेश जाधवयांची नियुक्ती केली आहे. जी एम भगत जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य तसेच राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भगवान भाई दाठीया यांच्या शिफारसनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीमुळे विविध क्षेत्रांमधून अध्यक्ष नागेश जाधव यांचे अभिनंदन होत आहे.
To Top