सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात आज दुपारी महाभयंकर स्फोट झाला. या आवाजाने चार तालुके हादरले. आवाज एवढा भयंकर होता. की नागरिक आवाज ऐकून घराच्या बाहेर पळाले. तर दि २८ रोजी बारामती तालुक्यातील वाणेवाडी (मळशी) येथे आकाशातुन काही रेल्वे सारख्या लाईट धावत असल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले हा व्हिडिओ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती लागला असून आपण तो लवकरच प्रेक्षकांना दाखवणार आहोत.
बारामती तालुक्यातील सुपे ते फलटण तालुक्यातील ताथवडे घाट तसेच माळशिरस तालुक्यातील नातेपुते ते खंडाळा तालुक्यात या स्फोटाचा आवाज आला. सुमारे सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास बहुतांश ठिकाणी जोरदार आवाज होऊन भूकंप सदृश्य घटना घडली असण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवण्यात येत आहे. तर भूकंप जेव्हा होतो तेव्हा कधीही स्फोट झाल्यासारखा आवाज होत नाही फक्त जनीम हादरते असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.