सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

कौतुकास्पद ! 'सोमेश्वर'च्या अध्यक्ष उपाध्यक्षांची चारचाकी वाहने जमा : उपाध्यक्षांच्या वाहनाचा खर्च अनाठायी नसल्याचे कारखाना प्रशासनाकडून स्पष्टीकरण

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी कारखान्याने कामाकाजासाठी दिलेल्या चारचाकी गाड्या जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठ वर्षांपासून पुरुषोत्तम जगताप यांनी अध्यक्ष या नात्याने कारखान्याच्या विविध कामासाठी गाडी वापरली. मात्र आता विविध विस्तारीकरणाच्या पार्शवभूमीवर काटकसरीचे धोरण अवलंबत जगताप व होळकर यांनी गाड्या परत केल्याने या निर्णयाबाबत सगळीकडे समाधान व्यक्त होत आहे. तसेच गुरुवारी झालेल्या संचालकमंडळाच्या बैठकीत गेस्ट हाऊसही बंद करण्याचा करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला.  
             कारखान्याचे विस्तारीकरण झाल्याने कारखान्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे. तसेच आता डिस्टलरी व सहविजप्रकल्पाचे विस्तारीकरण होणार असल्याने कर्जाचा भार  पडत जाणार आहे. काटकसर म्हणून आतापासूनच संचालक मंडळाने काटकसर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी पुढाकार घेत स्वतःपासूनच काटकसरीचा निर्णय घेत तातडीने वाहन परत केले. यापुढे ते आता आपले स्वतःचे वाहन वापरणार आहेत.
           सोमेश्वर कारखान्यात आजपर्यंत सर्वाधिक वाहन खर्च विद्यमान उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांच्या कार्यकाळात झाला असल्याची चर्चा सभासदांच्यात होत होती. या चर्चेचे सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी खंडन केले आहे. सन २००७  ते २०१४ कार्यकाळात उपाध्यक्ष सुनील भगत यांच्या पासून उपाध्यक्षांना चारचाकी वाहन देण्यात आले तेंव्हा पासून आजपर्यंत सात उपाध्यक्षांनी कारखान्याचे वाहन वापरले.  माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गिते यांनी एकदाही वाहन वापरल्याची नोंद नाही. ते स्वतःचे वाहन वापरत होते.
            याव्यतिरिक्त काल संचालक मंडळाच्या बैठकीत यावर्षी करार करून देखील ऊसतोड यंत्रणा अजून १० टक्के यंत्रणा आली नसून हार्वेस्टर जादा पावसामुळे बंद आहेत. त्यामुळे उसतोडीचे नियोजन, तसेच यावर्षी अनेक ऊसतोड यंत्रणा कामावर आली नसल्याने वाहतुकदारांच्या पैशांबाबत काय करता येईल त्याबाबत चर्चा  करण्यात आली. 
-----------------------------
पुरुषोत्तम जगताप : अध्यक्ष सोमेश्वर कारखाना 
एक दोन प्रवास वगळता उपाध्यक्षांची गाडी ही कारखान्याच्या कामाने फिरली आहे. मी गाडी जमा केल्यानंतर काल त्यांचा फोन आला की मी पण गाडी जमा करत आहे. तसेच गेस्ट हाऊस देखील बंद करण्यात आले आहे. तसेच कारखान्याचे नवीन प्रकल्प उभारत असल्याने खर्च व कर्ज वाढणार आहे. त्यामुळे आतापासूनच काटकसर करणे गरजेचे आहे. त्यात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. 
---------- --------------
राजेंद्र यादव : कार्यकारी संचालक सोमेश्वर कारखाना
काटकसर आणि बचत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. उघड दिसणारे गाड्या आणि गेस्ट हाऊस हे दोन खर्च संचालक मंडळाने कमी केले आहेत. तर उपाध्यक्षांच्या गाडीबाबत झालेला खर्च हा रेग्युलर खर्च आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : कौतुकास्पद ! 'सोमेश्वर'च्या अध्यक्ष उपाध्यक्षांची चारचाकी वाहने जमा : उपाध्यक्षांच्या वाहनाचा खर्च अनाठायी नसल्याचे कारखाना प्रशासनाकडून स्पष्टीकरण
कौतुकास्पद ! 'सोमेश्वर'च्या अध्यक्ष उपाध्यक्षांची चारचाकी वाहने जमा : उपाध्यक्षांच्या वाहनाचा खर्च अनाठायी नसल्याचे कारखाना प्रशासनाकडून स्पष्टीकरण
https://lh3.googleusercontent.com/-QgbQYn4jTNo/Y2ScsqQ_TtI/AAAAAAAAT-A/Ke3wMj3weZYpA-65GGerASGOoTvTz5kfQCNcBGAsYHQ/s1600/1667538088830933-0.png
https://lh3.googleusercontent.com/-QgbQYn4jTNo/Y2ScsqQ_TtI/AAAAAAAAT-A/Ke3wMj3weZYpA-65GGerASGOoTvTz5kfQCNcBGAsYHQ/s72-c/1667538088830933-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2022/11/blog-post_87.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2022/11/blog-post_87.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy