मेढा ! ओंकार साखरे ! जावली तालुक्यात विविध ठिकाणी दारू व जुगार अड्यांवर धाडी : लाखोंचा माल हस्तगत, मात्र गुन्हे दाखल करण्यास पोलिसांचा वेळकाढूपणा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
मेढा पोलीसांच्या कडून जावली तालुक्यातील केळघर , कुडाळ, सोनगाव आणि  सरताळे याठिकाणी धाडी टाकून दारू व जुगारी यांच्यावर गुन्हे दाखल केले. यामध्ये प्रोव्हीच्या पाच केसेस करण्यात आल्या. प्रोव्हीच्या केसेसमध्ये एकूण 76 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  तसेच एक जुगाराची केस करण्यात आली असून सदर  केस मध्ये एकूण 2 लाख 69 हजार 410 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.         दरम्यान दिवसभराच्या धाडीमध्ये गुन्हे दाखल करण्यात रात्र गेल्यान पोलीसांच्या या धडक कारवाई बाबत शंका उत्पन्न होत असून जुगारातील कोणाला उभय देण्यासाठी खटाटोप झाला याची  जिल्हा पोलीस प्रमुख दखल घेवुन चौकशी करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
           केळघर येथिल जुन्या एसटी स्टॅडच्या पाठीमागे संशयित आरोपी विक्रांत चंद्रकांत दळवी, वय 32 वर्ष रा. केळघर हा दारू विक्रि करताना आढळुन आला. त्याकडील देशी दारुचा रुपये १६ हजार ६४० चा माल हस्तगत करण्यात आला .
           सोनगाव येथील प्रतापगड धाब्याच्या अडोशाला देशी व विदेशी दारू विक्री करताना शाहरूख रसुल इनामदार वयं 28 वर्षे मुळ रा.भाडळे ता.कोरेगाव सध्या रा सोनगाव ता जावली हा संशयीत आढळुन आला. त्याच्याकडे 6000/- रू. कि च्या इंम्पेरियल ब्लु असे लेबल असलेल्या 180 मि ली च्या दारूने भरलेल्या 150 रू प्रत्येकी किंमत असलेल्या एकुन 40 काचेच्या सिलबंद बाटल्या,10,800/- रु किमतीच्या देशी दारू  मनोरंजन संत्र असे लेबल  असलेल्या 180 मिलीच्या दारूने भरलेल्या 144 सिलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत 70/- रुपये असा एकून 16,080 रु किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
            कुडाळ ते पानस पुनर्वसन रोडच्या शेजारी असले झाडाच्या खाली शंकर रामचंद्र पवार वय 45 वर्षे रा. कुडाळ हे बेकायदा बिगर परवाना देशी विदेशी दारू ची चोरटी विक्री करीत असताना आढळून आले त्याच्याकडून एकूण 19440 रुपये किमतीचा प्रोव्हीचा माल हस्तगत करण्यात आला .
         करहर ता. जावली येथील लाकडी वाखारीच्या आडोशाला शामराव बळवंत यादव वय 45 वर्षे रा. खर्शीबारामुरे (बलकवडेवाडी) हे आढळून आले असुन त्यांच्याकडून देशी विदेशी दारूचा एकूण 14560 रुपये किमतीचा प्रोव्ही चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
        सरताळे गावचे हद्दीत कुडाळ ते पाचवड जाणाऱ्या रोडवर असणारे राज इंडियन धाब्याच्या पाठीमागे सचिन तुकाराम भिसे वय 46 वर्ष रा. सरताळे हे आढळुन आले असुन त्यांच्या कडून देशी विदेशी दारूचा एकूण 10080/- रुपये किमतीचा प्रोव्हीचा माल मिळाला आहे. 
           तसेच सरताळे गावच्या हद्दीत सरताळ्याचा माळ या ठिकाणी असले असले शेडमध्ये तीन पानी पत्ते जुगार खेळताना विष्णू श्रीरंग शिंदे वय 51 वर्ष , संदीप रामदास वारागडे वय 39 वर्ष, अशोक धोंडीबा मोरे वय 65 वर्ष हे सर्व रा. कुडाळ येथिल असुन जयवंत बळवंत गुटाळे वय 46 वर्ष, राजू सदाशिव चव्हाण वय 48 वर्ष, तानाजी श्रीपती पवार वय 55 वर्ष, प्रमोद मारुती केंडे वय 48 वर्ष, रवींद्र बाळकृष्ण काळे वय 38 वर्ष हे सर्व रा. सरताळे येथिल आहेत.
  जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना पुरस्कार प्राप्त झाला असुन पोलीस यंत्रणा गुन्हे दाखल करण्यास व पत्रकारांना माहीती देण्यास विलंब का? लावतात हा संशोधनाचा विषय ठरला आहे. यांच्या कडून एकूण 2,69,410/- रु. किमतीचा माल, रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
           या गुन्हयांच्या नोंदी मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आल्या असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी सांगीतले आहे. सपोनि अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. या गुन्ह्यामधील संशयीत आरोपींना नोटीसा बजावण्यात आल्या असलाची माहिती सपोनि अमोल माने यांनी दिली आहे.
          सरताळे येथिल तीन पानी जुगारावर छापामारीत काहींना क्लिन चिट दिली असुन यामागे अर्थ कारण दडलय काय अशी जोरदार चर्चा सुरु असुन त्या त्रिमुर्तीचा शोध जिल्हा पोलीस प्रमुख घेणार कि त्यावर पांघरून घालणार हे मात्र गुलदस्त्यातच असणार आहे.
To Top