सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : दौलतराव पिसाळ
वाई येथील गणेश हौसींग सोसायटी (यशवंत नगर ) मधील प्लांट नंबर १९ मध्ये अज्ञात चोरट्यांनी घुसून घरात प्रवेश करुन दिड महिन्या पुर्वी तब्बल १ लाख २८ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेहल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली . हि तक्रार दाखल होताच वाई पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष अधिकारी पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी तात्कारीची गंभीर दखल घेऊन याची माहिती माहिती नुकतेच हजर झालेले जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख अप्पर पोलिस अधिक्षक अजीत बोर्हाडे वाईच्या डिवायएसपी शितल खराडे जानवे यांना कळविली .वरील सर्व प्रमुख अधिकारी वर्गांनेही गंभीर दखल घेऊन पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्या साठी सखोल मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या .
या गुन्ह्याचे स्वरुप गंभीर असुन देखील तक्रारदारानी तब्बल दिड महिना ऊशीरा वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने आरोपी शोधणे पोलिसांना कठीण जाणारे होते तरीही बाळासाहेब भरणे यांनी सदैव गुन्हे गारांच्या तात्काळ मुसक्या आवळुण प्रत्येक महिन्याला जिल्हा पोलिस प्रमुखांच्या हस्ते प्रशस्ती पत्र मिळवणार्या आणी गुन्हेगारांचे गर्दन काळ म्हणून नावलौकिक प्राप्त असलेल्या व सदैव कार्यतत्पर असणार्या डिबी विभागाचे प्रमुख हवलदार विजय शिर्के महिला पोलिस हवलदार सोनाली माने किरण निंबाळकर श्रावण राठोड
प्रसाद दुदुस्कर अमीत गोळे यांना आपल्या केबीन मध्ये बोलावून त्यांना सखोल मार्गदर्शन करुन स्वता बाळासाहेब भरणे वरील डिबी टिमला सोबत घेऊन चोरी झालेल्या घराची आणी परिसराची पाहणी केली व भरणे यांच्याकडे असणारे खास खबर्यांना देखील माहिती काढण्या साठी नेमलेले होते . त्याच बरोबर वरील डिबी टिमला घरासह परिसरात सापळा लावुन या घरात कोणा कोणाचे येणे जाणे असते याची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते .त्याच दरम्यान पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना खबर्या सह आणी डिबी पथका मार्फत माहिती मिळाली कि तक्रारदार यांच्या घरात त्यांची आई एकटीच असते त्यांच्या घरातील कामे करण्या साठी अधुन मधुन सोमजाई नगर येथील श्रीमती द्रोपदाबाई बाबा चव्हाण वय ५४ या महिला येत होत्या अन भरणेसाहेब यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली अन लगेच भरणेसाहेब बाहेर पडुन सोबत डिबी पथकाला घेऊन संशयास्पद असलेल्या द्रोपदाबाई चव्हाण राहणार सोमजाई नगर यांचे घर गाठले आणी तपास गतीने सुरु झाला त्यांना विश्वासात घेऊन विचारले असता त्या मी चोरी केलीच नाही असा कांगावा करु लागल्या त्या वेळी किरण निंबाळकर यांनी तुम्ही त्या घरातील सीसीटिव्ही कॅमेरा मध्ये दागिने चोरताना दिसत
आहात असा ठोस टाकताच द्रोपदाबाई यांच्या पायाखालची जमीन डुलायला लागली त्या मुळे त्यांनी दागिने चोरल्याची कबुली दिली .आणी तब्बल १ लाख २८ हजार रुपये किमतीचे बांगड्या कानातील फुले व लहान मंगळसुत्र असे साडेतीन तोळ्याचे दागिने या महिलेने घरात असणार्या गॅस सिलेंडर टाकीच्या खाली लपवुन ठेवलेले दागिने काढुन बाळासाहेब भरणे यांच्या सह डिबी पथकाच्या ताब्यात दिले पथकाने आरोपी असलेल्या द्रोपदाबाई चव्हाण यांना ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणुन त्यांच्या वर चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे .हा गुन्हा तातडीने उघडकीस आणल्याने वाई तालुक्यातील जनतेने कौतुक केले आहे .
COMMENTS