सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मुरूम ता बारामती येथील अवधूत कोरडे यांची हंगेरी देशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
युरोप येथील बुडा पोस्ट हंगेरी येथे ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत या स्पर्धा पार पडणार आहेत.
वर्ल्ड चॅम्पियन बेल्ट ररेसलिंग कुस्ती स्पर्धेसाठी ७० किलो वजनी गटात कोरडे यांची निवड झाली आहे. अवधूत कोरडे यांनी यापूर्वी श्रीलंका कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी करत ब्रांच पथकाची कमाई केली होती तसेच विविध ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या स्पर्धेसाठी सोमेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळ यांचे कोरडे यांना सहकार्य लाभले. संघाचे प्रशिक्षक सी ए तांबोळी व महाराष्ट्र केसरी पै अमोल बुचडे यांचे मार्गदर्शन लाभले.