सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
चार दिवसापुर्वी वाई शहरात अज्ञात टोळीने मध्य रात्रीच्या दरम्यान गंगापुरी रवीवार पेठ घोरपडे हॉस्पिटल रामडोह आळी परिसरातील रस्त्यावर लावलेल्या १२ चारचाकी गाड्यांच्या पुढील पाठी मागील काचा फोडुन गंगापुरी येथे एक दुचाकी जाळण्यात आली होती त्याची तक्रार दाखल होण्या आधीच वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे आणी डिबी पथकाने युध्द पातळी वर तपास सुरु करुन सातारा येथील बॉम्बे रेस्टारेंट परिसरात सापळा लावुन चार आरोपींना गजाआड करण्यास वाईच्या डिबी पथकाला यश आल्यामुळे वाईच्या नगरसेवकांनसह नागरीकांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे कौतुक केले आहे.
पण अचानक १२ वाहनांच्या काचा फुटल्याने वाई शहरातील नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरी शेजारी असणारे अतिआक्रमण जिल्हा प्रशासनाने प्रचंड पोलिस बंदोबस्तात जमीन दोस्त करण्यास यश मिळविले होते त्याचा राग मनात धरून काहींनी बदला घेण्यासाठी अथक दहशत निर्माण करण्या साठी हे काचा फोडण्याचे कृत्य केले असावे असा वाईतील नागरीकांचा समज होवुन भितीचे वातावरण निर्माण होवून तणावाची परस्थिती निर्माण झाल्याने पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना पहाटे पासुनच काचा फोडण्याचा हा काय प्रकार आहे असे फोन करुन विचारत होते पण हि घटना घडल्या पासून बाळासाहेब भरणे डिबी पथकाचे हवलदार विजय शिर्के महिला पोलिस नाईक सोनाली माने किरण निंबाळकर श्रावण राठोड अमीत गोळे प्रसाद दुदुस्कर या सर्वांनी गेल्या चार दिवसा पासून गाड्यांच्या काचा फोडल्या त्या त्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेज चेक करण्याचे काम युध्द पातळी वर सुरु केले होते पण त्यात चार तरुण एकाच दुचाकीवर फिरताना दिसत होते पण चेहरे स्पष्टपणे दिसून येत नसल्याने तपासात अडचणी येत होत्या अखेर भरणे आणी डिबी पथक आपल्या बुद्धी
कौशल्याचा वापर करत आरोपी निष्पन्न करुन घेतले पोलिस पथक भिंगरी सारखे फिरुन वाई शहर आणी परिसरात गेली चार दिवस रात्र दिवस अनेक ठिकाणी छापे मारी करत होते पण रिकाम्या हाताने परतावे लागत होते .
अखेर दि.१८ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी असलेले विजय मचिंद्र धोत्रे वय २१ व समीर रव्वाजा पठाण वय १९ दोघेही राहणार सिद्धनाथवाडी वाई हे दोन आरोपी सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात असल्याची माहिती मिळाल्यावर बाळासाहेब भरणे आणी डिबी पथकाने त्या ठिकाणी सापळा लावुन परिसर पिंजून काढला तरीही आरोपी हाताला लागत नव्हते अखेर दुपार नंतर पाच वाजण्याच्या सुमारास या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळण्यास पथकाला यश आले .
हे दोन्ही आरोपींना वाई पोलिस ठाण्यात आणुन त्यांच्या कडून इतर दोन आरोपींची ठिकाणांची माहिती घेऊन त्यांनाही ताब्यात घेण्यात आले .या चार आरोपींन पैकी विजय धोत्रे आणी समीर पठाण यांना सोबत घेवून वाई शहरातील कुठे कुठे गाड्यांच्या काचा फोडल्या ती ठिकाणे घटना स्थळावर जाऊन त्यांच्या कडून माहिती घेण्यात आली या घटना स्थळावर आरोपी पोलिसांनी आणले आहेत याची माहिती वाईकर नागरिकांना समजताच त्यांना पाहण्या साठी नगरसेवकांनसह नागरीकांनी प्रचंड गर्दी केली होती या वेळी नागरीकांन कडून रागाच्या भरात काही अनुचित दुर्घटना घडु नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त भरणे यांनी ठेवला होता धोत्रे व पठाण याने गंगापुरी येथे एक दुचाकी पेटवून देण्यात आल्याची कबुली पोलिसांन समोर दिली आहे