सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबाडे ता.भोर केंद्रात चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत कला,क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धां उत्साहात पार पडल्या असून केंद्रातील २५० चिमुकल्या खेळाडूंनी भाग घेतला होता.
आंबाडे केंद्रातील १३ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या चिमुकल्या खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.स्पर्धेचे उद्घाटन केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे व मुख्याध्यापक राजेंद्र चौगुले यांच्या हस्ते केले गेले.स्पर्धांमध्ये भजन, लोकनृत्य, खोखो ,कबड्डी ,थाळीफेक, गोळा फेक ५०- १०० मीटर धावणे ,लांब उडी ,उंच उडी या खेळांचा समावेश होता.स्पर्धेमधील प्रथम क्रमांकाचे खेळाडू बीट पातळीवर खेळणार असल्याचे बापू जेधे यांनी सांगितले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तृप्ती वाघोलकर ,शिक्षक खंडू घोलप,भीमराव शिंदे,राजू कारभळ, मंगल घोलप, संपत रांजणे,हरीप्रसाद सवणे,उषा गोरड, अंजना घोलप,रवी थोपटे,शिवाजी खोपडे,भारती गरुड, माधुरी घाटे ,संजय पवार ,अनिल महांगरे ,संदीप घाडगे ,रूपाली कोळी ,अभिजीत मखरे उपस्थित होते.