सोमेश्वर रिपोर्टर टिम-------
जावली : प्रतिनिधी(धनंजय गोरे)
सातारा जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या संचालकपदी सावली गावचे सुपुत्र व ग्रामविकास अधिकारी दिलीपराव जुनघरे यांचा प्रचंड बहुमताने विजय झाल्याबदल त्यांचा सत्कार सावली ग्रामस्थांच्यावतीने सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांच्या हस्ते करण्यात आला .
सरपंच विजय सपकाळ अध्यक्षस्थानी होते . यावेळी उपसरपंच बाबुराव भिलारे, अजिंक्य नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर, पोलिस पाटील संजय कांबळे तसेच ग्रामपंचायतीच्या सदस्य आनंदा जुनघरे,सुरेश कांबळे, सदस्या आनंदी जुनघरे, वनिता म्हस्कर, रूपाली जुनघरे, निर्मला जुनघरे, गामसेविका कुंभार मॅडम,माजी सरपंच दुर्योधन जुनघरे, माजी सरपंच सुवर्णा जुनघरे, , युवा नेते प्रशांत जुनघरे, पाणलोट समिचे अध्यक्ष पांडूरंग जुनघरे, सचिव शंकरराव मोरे, मंडळाचे माजी अध्यक्ष बाबुराव जुनघरे , कृषी सहाय्यक विलास कदम, शेवते शासकीय अधिकारी कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा व कर्मचारी आदी उपस्थित होते .
सहायक पोलिस निरीक्षकअमोल माने म्हणाले,आपल्या कार्यातून आणि कर्तव्यदक्ष कामातून आपल्या कार्याची वेगळी ओळख निर्माण करणारे ग्रामविकास अधिकारी दिलीपराव जुनघरे यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून सर्वांनाच आदर्शवत आहे . त्यांच्या सर्वोत्तम कामामुळेच त्यांची लोकप्रियता वाढून ते आज प्रचंड बहुमताने ग्रामसेवक पंतसस्थेवर निवडून जातात हे सगळ्या तं मोठ यश असून त्यांनी केलेल्या कामाची पोहच पावती आहे . सावली गाव एक आदर्श गांव असून या गावला एक विधायक सामाजिक विचारधारा असलेले पत्रकार विजय सपकाळ सरपंच झाले आहेत . हे गावच्या विकासा साठी निश्चित उपयोगी होईल .आम्ही सर्वात्तपर सहकार्य करू .
सरपंच विजय सपकाळ म्हणाले, आपल्या गावचं सावलीचं नावं तालुक्यासह सातारा जिल्ह्यात उंचविण्याच कामं दिलीपराव जुनघरे यांनी केले असून त्यांचे आपल्या गावांसाठी मोठं योगदानं आहे .
तालुकास्तरीय ते जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळविला आहे . आपल्या सर्वोकृष्ट कामातून ज्या गावात सेवा केली त्या त्या गावांना राज्यापासून ते देशापर्यंतचे पुरस्कार मिळविणारे एक अटपैलू व्यक्तीमत्व आहे . ते आज कुठेही सेवेत असलेले तरी आपल्या गावासाठी खुप योगदान देतात . असेच सहकार्य व मार्गदर्शन गावाला राहावे असेही सरपंच यानी स्पष्ट केले .
सत्काराला उत्तर देताना दिलीपराव जुनघरे म्हणाले, संचालक झाल्यानंतर हा माझा झालेला घरचा सत्कार असून हा सर्वात माझ्यासाठी मोठा आणि सम्मानाचा आहे . याबददल मी सावली ग्रामस्थ, ग्रामपंचायत व अजिंक्य नेहरू युवा मंडळ यांचा मनःपुर्वक आभारी आहे . यापुढेही आपल्या सावली गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन . सावली गावला विजय सपकाळ एक चांगले विकासात्मक सरपंच लाभले असून उपसरपंच व सर्व सदस्य एक चांगली टीम आहे . निश्चित यांच्या माध्यमातून गावामध्ये मोठी विकासकामे उभी राहतील त्यासाठी आम्ही सहकार्य देवू . अजिंक्य नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप म्हस्कर यांनी आभार मानले .