सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी(ता.बारामती) येथील हरणाई चौकातील चार दुकानांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. यामध्ये प्रतिम भोसले यांच्या किराणा दुकानातील रोख १५ हजार रुपये व किराणा साहित्य चोरून नेले. दुकानाच्या मागे असलेली लोखंडी खिडकी कटावणीने बाजूला करत चोरट्यांनी आत मध्ये प्रवेश करत चोरी केली. शेजारीलच केतन जगताप यांचे स्वामी समर्थ मेडिकल मधील २ हजार ५०० रुपये रोख, संग्राम कोंडे यांचे केक शॉपीतील १ हजार ५०० रुपये आणि योगेश गडदरे यांचे माऊली मेडिकलमधील ७ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी पाठीमागून फोडत चोरट्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश शेलार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. चालू वर्षातील बारामतीच्या पश्चिम भागातील पहिलीच चोरी वर्दळीच्या ठिकाणी झाली असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
COMMENTS