पुरंदर ! नीरा-जेजुरी दरम्यान पिसूर्टी येथे रेल्वेच्या धडकेत एकजण ठार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील पुणे मिरज लोह मार्गावर  पिसूर्टी येथे रेल्वेची घडक बसल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवार (दि.१८) रोजी रात्री ११ वाजलेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृताची ओळख अद्याप पटली नसून मृत व्यक्तीने चौकड्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. 

      पुरंदर तालुक्यातील नीरा वाल्हे दरम्यान ही घटना घडली आहे. या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे शरीराचे अनेक तुकडे झाल्याने त्याची ओळख पटवणे अवघड झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून या घटनेचा अधिकचा तपास जेजुरी पोलीस करीत आहे. या भागतील कोणाच्या  घरातील व्यक्ती हरवली असल्यास जेजुरी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केल आहे.
To Top