बारामती ! वर्दळ नसताना नीरा-बारामती रस्त्यावर उसाने भरलेली ट्रॉली पलटी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
नीरा बारामती रस्त्यावर वाघळवाडी येथे भारत पेट्रोल पंप समोर उसाने भरलेली ट्रोली पलटी झाली. सकाळी सव्व्वा सात वाजता ही घटना घडल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. 
           सकाळी या रस्त्यावर वर्दळ कमी असते. जर का ही ट्रॉली आठ वाजण्याच्या पुढे पलटी झाली असती तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमेश्वर कारखान्यावर नीरा बाजूने सोमेश्वर कारखान्याकडे उसाने भरलेल्या दोन ट्रॉली जात असताना अक्षय गार्डन पूढील उतारावर हा अपघात घडला आहे. ट्रॉली पलटी झाल्यावर रस्त्यावर सर्व ऊस पडला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 
To Top