वाई ! ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदाची धुरा यशस्वीपणे संभाळणारे संजय काळुखे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ 
ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कुलचे प्राचार्य संजय भिमराव काळुखे वय ५४ यांचे अल्पशा आजाराने यशवंत हाँस्पिटल सातारा येथे दुःखद  निधन झाले. पंचायत समिती कोरेगाव येथील अधिक्षक सौ वर्षा काळुखे  यांचे ते पती होत.त्यांचेवर सातारा माहुली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या या अचानक झालेल्या  निधना मुळे वाई तालुक्यातीच्या  शिक्षण क्षेत्रात    हळहळ व्यक्त केली जात आहे .
पसरणी घाटाच्या पायथ्याशी निसर्गाने नटलेल्या परिसरात वाईच्या दक्षिण काशीत  भव्य इमारतीसह डौलाने ऊभी असलेले हे ज्ञान दाणाचे  मंदिर  वाई शहरासह तालुक्यातील गावा गावांन मध्ये शिक्षण क्षेत्रात अग्रणी असे नाव लौकिक प्राप्त असलेल्या ज्ञानदीप शाळेचे प्राचार्य   मुळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेले    संजय काळुखे हे २००४ साली गणित विषयाचे शिक्षक म्हणून ज्ञानदीप स्कुल मध्ये  रुजू झाले
ते गणित विषयाचे गाडे अभ्यासक असल्याने  जिद्द आणी चिकाटीच्या जोरावर त्यांचे   इयत्ता १० वीतील अवघड अशा   गणित विषयांचे विद्यार्थी हे दरवर्षी १०० पैकी १०० गुण मिळवुन नेहमीच प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरायचे हि गौरवशाली परंपरा साळुंखे सर यांनी कायम जोपासली   होती या गौरवशाली परंपरे मुळे दिवसे दिवस शाळेच्या नाव लौकिकात वाढ होताना दिसत होती त्या मुळे विद्यार्थी संख्येतही वाढ होत गेली . एक हाडाचा शिक्षक म्हणून येथील संस्था चालकांनसह  शिक्षकांच्या  
मनात आदराचे स्थान निर्माण करणारे  प्राचार्य संजय काळुखे यांच्या चांगल्या कामाची दखल संस्था चालकांनी घेऊन नोहेंबर २०२१ मधे मध्ये चांगल्या कामाची पोहच पावती म्हणून त्यांना ऊप प्राचार्य हे पद 
 बहाल करण्यात आले .या पदावर गेल्या नंतर त्यांनी संस्था चालकांन सह सहकारी शिक्षकांंच्या हातात हात घालुन शाळेची विद्यार्थी संख्या वाढविण्या साठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे धाडसी काम देखील त्यांनी  केले होते . सतत हसत मुख आणी समंजस भुमीके मुळे ते विद्यार्थी प्रिय झाले . तेथे असणारे प्राचार्य नोकरी सोडून गेल्या वर संस्था चालकांनी रिक्त झालेल्या प्राचार्य या पदावर संजय काळुखे यांची नियुक्ती केली .या पदावर कार्यरत असताना सुध्दा त्यांनी आपल्या सहकारी शिक्षक आणी शाळेतील इतर कर्मचारी विद्यार्थी पालक  यांच्या बरोबर सलोख्याचे संमध कायम ठेवत शिक्षण क्षेत्रात असणार्या स्पर्धेत सुध्दा ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या  ज्ञानाची जोत  सदैव तेवत ठेवुन एक  यशस्वी प्राचार्य म्हणून त्यांनी स्वताची वेगळी ओळख निर्माण केली होती .
पण दुर्दैवाने संजय काळुखे हे करत असलेले 
चांगले काम नियतीलाच मान्य नसल्याने त्यांना अचानक ह्रदय विकाराचा तिव्र झटका आल्याने 
त्यांना सातारा येथील खाजगी रुग्णालयात ऊपचारा साठी दाखल केले असता ऊपचारा दरम्यानच त्यांच्या वर काळाने झडप घातल्याने अखेर त्यांचे  दि. १९ रोजी दुःखद निधन झाले .
हि दुःखद बातमी ज्ञानदीप शिक्षण संस्थेत वार्यासारखी पसरल्याने  संस्था चालकांन सह सहकारी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी  हे शोक सागरात बुडाले .
त्यांच्या वर सातारा येथील माहुली स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यांच्या अंतविधी समयी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप चव्हाण विश्वस्त राहुल जाधव प्रभारी प्राचार्य शुभांगी पवार किसनवीर महाविद्यालयाचे प्राध्यापक अर्जुन जाधव सचिन लेंबे प्रमोद लोढे अमर सापते आणी कै.संजय काळुखे यांनी आज पर्यंत  घडवलेले विद्यार्थ्यांन सह सामाजिक  राजकीय शैक्षणिक सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .
To Top