बारामती ! भारतीय मानक संस्थेचा वाणेवाडी येथे जनजागृती कार्यक्रम

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----- -
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी व BIS (भारतीय मानक संस्था ) यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी भारतीय मानक संस्थेच्या वतीने  मानक संवर्धन अधिकारी पुणे शाखेचे श्री हर्षमोहन शुक्ला व श्री अमन सिंह व शारदानगर विद्यालयातील शिक्षक वृंद उपस्थित होते.
             बमान्यवरांचे स्वागत प्राचार्य संजय कांबळे यांनी केले. पूर्वीची आय. एस. आय हीच संस्था बी.आय.एस म्हणून कार्यरत आहे. औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांचा दर्जा राखण्यासाठी त्यांची तपासणी करून त्यांचे प्रमाणिकरण करण्याचे कार्य ही संस्था करते. दर्जा मानकाप्रमाणे असल्यास त्या उत्पादनावर आय.एस.आय किंवा बी.आय.एस असे छापण्यास परवानगी देण्यात येते. अशी माहिती शुक्ला यांनी दिली. बाजारामध्ये कोणतेही उत्पादन खरेदी करत असताना विद्यार्थ्यांनी आय.एस.आय किंवा बी.आय.एस हे चिन्ह पाहूनच,ॲपवर त्याची खात्री करून ते खरेदी करावे.जर आपल्याला उत्पादनामध्ये दोष आढळला तर ग्राहक मंचाकडे त्याची तक्रार करता येते. प्रत्येक नागरिकाच्या मोबाईल मध्ये बी.आय.एस केअर ॲप असणे आवश्यक आहे. म्हणजे उत्पादनाचा दर्जा तपासता येतो. याप्रसंगी ॲड. गणेश आळंदीकर यांनी सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता कशी तपासायची, ते किती कॅरेटचे आहे, त्याची शुद्धता किती आहे हे तपासण्या संदर्भात माहिती दिली. BIS संबंधित पथनाट्य, पोस्टर्स तयार करणे , निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या .विद्यार्थ्यांनी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राजक्ता यादव यांनी सूत्रसंचालन केले . तर गणेश पोंदकुले ,अशोक भोसले, सुप्रिया तांबे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. BIS च्या मेंटॉर्स म्हणून सुजाता वाबळे यांनी काम पाहिले.
To Top