सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
वेळोवेळी चारित्र्याच्या संशयावरून मारहाण, शिवीगाळ तसेच मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी पिडीत महिलेच्या पती, सासू व नंदे वर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत बारामती तालुक्यातील मेदड येथील पीडित महिलेने माळेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती यावरून माळेगाव पोलिसांनी पती विशाल चंद्रकांत नेवसे, सासु -कमल चंद्रकांत नेवसे, दोन्ही रा. मेडद ता. बारामती जि पुणे, नंनद- जयश्री बाबा रासकर राः न्हावी ता. इंदापुर जि. पुणे व निमा संतोश दगडे, माळवाडी लोणी ता. बारामती जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर हकीकत दि. 04/02/2021 रोजी लग्न झालेनंतर 6 महिनेपासुन ते दि. 10/11/2022 रोजी पर्यंत वेळोवेळी पीडित महिलेचे पती विशाल चंद्रकांत नेवसे, सासु कमल चंद्रकांत नेवसे, दोन्ही रा. मेडद ता. बारामती जि पुणे, ननंद जयश्री बाबा रासकर रा न्हावी ता इदांपुर जि. पुणे व निमा संतोश दगडे, माळवाडी लोणी ता. बारामती जि पुणे. यांनी पीडित महिलेवर वेळोवेळी चारीत्र्यावर संशय घेवुन हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारणेची धमकी देवुन मला उपाशी पोटी ठेवून माझा मानसिक व शाररीक छळ केला आहे. तसेच तिच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने गोळ्या देवून गर्भपात केलेला आहे. आशा आशयाची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत नोंदवल्यानंतर पोलिसांनी वरील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.