बारामती ! बारामती तालुक्यात हृदयविकार रुग्णांचा महिन्याचा दहाचा रुग्णांचा आकडा दिवसाला दहा रुग्ण होणे चिंताजनक : डॉ रमेश भोईटे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कोविड काळ सोडला तर भारतात मधुमेह, रक्तदाब व हृदयविकारांचे रुग्ण जगात जगात सर्वाधिक जास्त रुग्ण भारतात आहेत. पूर्वी ६० ते ७० वर्षानंतर लोकांना हृदयविकार होत होता. आता मात्र कोणत्याही वयात हृदयविकार होऊ लागला आहे. एकट्या बारामती तालुक्यातील महिन्याला फक्त ५ ते १० पेशेंट होते.आज तो आकडा दिवसाला १० वर गेला आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे मत बारामती येथील गिरीराज हॉस्पिटलचे डॉ रमेश भोईटे यांनी व्यक्त केले.  
           सोमेश्वरनगर ता बारामती येथे साईसेवा हॉस्पिटलच्या दुसरा वर्धापनदिन व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ रमेश भोईटे होते. शिबिराचे उदघाटन बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, बारामती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पंचायत समिती सभापती नीता फरांदे, गौतम काकडे, डॉ. मनोज खोमणे, सुनील भगत, अभिजित काकडे, ऋषी गायकवाड, सुनील भोसले, नामदेव शिंगटे, किरण आळंदीकर, सतीश सकुंडे, अजिंक्य सावंत, संतोष कोंढाळकर, सुचिता साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. 
रुग्णांना हॉस्पिटलला पोहचवणाऱ्या देवधुत बाळासाहेब काकडे, मामा बोबडे इंद्रजित भोसले, सुनील शिंदे यांना देवधुत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात १ कुटुंब ४ सदस्य या आरोग्य योजनेचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ रमेश भोईटे पुढे म्हणाले, गरीब रुग्णांची सेवा करून त्याचा प्राण वाचवणे हे डॉक्टरांचे काम आहे. २० नोव्हेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत ठेवलेल्या आरोग्य शिबिरामुळे अनेकांना याचा फायदा होणार आहे. 
           कार्यक्रमात सोमेश्वर कारखान्याचे मा अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी  परिसरातील नागरिकांसाठी साईसेवा हॉस्पिटलचे करत असलेले काम कौतुकास्पद असल्याचे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर म्हणाले, ग्रामीण भागातील साईसेवा हॉस्पिटलने घेतलेले आरोग्य शिबीर सर्वसामान्यांच्या फायद्याचे आहे. गरजू व उपेक्षित घटकांना या शिबिराचा निश्चित फायदा होईल असे मत व्यक्त केले. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, नेत्यांची अपेक्षा नसताना काही जणांकडून गाजावाजा करून कार्यक्रम घेतले जातात. यापेक्षा वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम घेणे आवश्यक आहे. तसेच सोमेश्वर सारख्या ग्रामीण भागात डॉ. भिलारे व डॉ शिंगटे यांनी अद्ययावत हॉस्पिटल उभारून शहरात मिळणारी वैद्यकीय सेवा ग्रामीण भागात उपलब्ध करून दिली आहे. असे सांगितले.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूलाल पडवळ यांनी केले तर आभार डॉ. विद्यानंद भिलारे यांनी मानले. 
To Top