सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कात्रज : प्रतिनिधी
नवले ब्रिजजवळ भीषण अपघात झाला असून भरधाव टँकरने अनेक गाड्या उडवल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एकूण ४७ गाड्यांचा समावेश आहे. दरम्यान सदर ठिकाणी अग्निशमन विभागाच्या २ रेस्क्यू वाहन काम करत आहेत. पुण्यातील दरी पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. नवले पुलाजवळ कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर धडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या विचित्र अपघातात १५ ते १६ गाड्या उडवल्याची माहीती पोलिसांना मिळाली आहे. घटनास्थळी सिंहगड पोलीस दाखल झाले आहेत.
जवळपास ४७ हून अधिक गाड्या एकमेकांना धडकून अपघात झाला असून ५० ते ६० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.