भोर-आंबाडे रस्त्यावरील खड्डे बुजवल्याने वाहनचालकांमध्ये समाधान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
मागील दोन महिन्यांपासून भोर-आंबाडखिंड मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडले होते. खड्ड्यांमुळे हजारो वाहनचालकांना दररोज कसरत करावी लागत होती.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्यावरील खड्डे बुजवल्याने वाहनचालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
           भोर -आंबाडखिंड मार्ग वाई ,महाबळेश्वर,काळुबाई देवी ,पाचगणी या पर्यटन स्थळाकडे जाण्यासाठी जवळचा आणि महत्त्वाचा मार्ग आसल्याने मार्गावर मोठ्या प्रमाणावर दैनंदिन वाहतूक सुरू असते.तसेच शेकडो कामगार वर्ग या रस्त्यावरून ये जा करीत असतो. वाहन चालकांचे होणारी दररोजची कसरत लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविले असल्याने रस्ता वाहतुकीसाठी सोयीस्कर झाला आहे.परिणामी वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
To Top