सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावाला पिढ्यानपिढ्या स्मशानभूमी नव्हती सर्व नागरिकांचे अंत्यसंस्कार उघड्यावरती होत होते अनेक वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न सुटत नव्हता. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे वारंवार मागणी होत होती गावाला स्मशानभूमीसाठी जागा मिळावी. तसेच प्रत्येक ग्रामसभेमध्ये खूप मोठ्या चर्चेचा विषय होत होता बाहेरून गावावरून येणारे नातेवाईक आतपेष्ठ मित्रपरिवार यामध्ये मोठा चर्चेचा विषय होता की एवढा मोठा गाव पण एक साधी स्मशानभूमी नाही गावच्या हद्दीत शेजारील गावांच्या दोन-दोन स्मशानभूमी पण वाघळवाडी गावाला अजून स्मशानभूमी बांधता आलेले नाही. अगदी अजित दादांनी सुद्धा स्मशानभूमीसाठी गाव पुढाऱ्यांनी जागा उपलब्ध करून द्यावी असा आदेश /सूचना इशारा दिला. तरीही प्रश्न काही सुटत नव्हता अखेर गावातील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, सदस्य व युवा नेत्यांनी आपल्या ग्रामपंचायतीची मालकीची जागा सोमेश्वर कारखाना जागेलगत १०२ गटांमध्ये वाघळवाडी ग्रामपंचायत मालकीची १० गुंठे जागा आहे त्या ठिकाणी आपण स्मशानभूमी उभारूयात असे ठरले त्याबाबत आम्ही सर्व गावकऱ्यांना, ग्रामस्थांना महिलांना व युवकांना घेऊन त्या जागेच्या ठिकाणी जागा पाहण्यासाठी गेलो. पण त्यातील काही जेष्ठ ग्रामस्थांनी अशी शंका उपस्थित केले की ही जागा जलसंपदा विभागाची असून आपण त्या ठिकाणी स्मशानभूमी करू शकत नाही सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत की आपण त्या जागेमध्ये करू शकत नाही जर आपण केली तर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी अडचणीत जातील व सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल हे कृत्य होईल असे सांगितले. याला काही युवक सुद्धा साक्षीदार आहेत.
त्यानंतर आम्ही २ महिने विचार विनिमय करण्यासाठी वेळ घेतला पण काही करून त्या ठिकाणी आपली १० गुंठे हक्काची जागा असताना आपण स्मशानभूमी त्यास ठिकाणी करायचे असा निश्चय केला त्यानुसार आम्ही लोखंडी पूल येथील नागरिकांना विश्वासात घेऊन कामकाज चालू केले. पुढे असे झाले की त्याला काही गावातील नेत्यांनी नागरिकांनी स्मशानभूमी होऊ नये व काम बंद करावे व लोखंडी पुलावर नागरिकांच्या मनामध्ये वेडेवाकडे संभ्रम निर्माण करून काम बंद करण्यासाठी भाग पाडले त्यानंतर आम्ही येथील नागरिकांची समजूत काढून आश्वासन दिले व आपणास कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याबाबत हमी दिली व त्याही सर्व नागरिकांनी आमच्या विश्वास ठेवून आम्हाला चांगल्या प्रकारची साथ दिली.
त्यानंतर एवढे करूनही न थांबल्यावरती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना जलसंपदा विभागाची जागा आहे व तुम्ही काहीच का करत नाही नाहीतर आम्ही तुमच्यावरती कारवाई करण्याबाबत वरिष्ठांना सांगू हो काय करायचं त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवरतील गुन्हे दाखल करण्याबाबत जलसंपदा विभागाने नोटीस काढली व काम बंद केले
आम्ही ग्रामपंचायत पदाधिकारी पुणे विभागाचे मुख्य अभियंता श्री.धोडपकर यांना भेटून राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी ही जागा सोमेश्वर कारखान्याने ग्रामपंचायतला दहा गुंठे दिलेली आहे तरी आपण काम थांबवण्यात येऊ नये आणि अजित दादांनी वाघळवाडी स्मशानभूमी बाबतचा प्रश्न लवकर लवकर मिटवण्याबाबतच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार आम्ही पुन्हा काम चालू केले. तरीसुद्धा काही गावातील नागरिक स्मशानभूमी होऊ नयेत याबाबत अटीतटीचे प्रयत्न करत होते त्यानंतर त्यांनी आम्हाला दुसरी नोटीस काढली व त्या ठिकाणी येऊन काम बंद केले तरीही आम्ही त्या ठिकाणी न थांबता त्यांना सक्त सूचना दिली की आपण आमच्यावरती पोलीस स्टेशनला त्वरित गुन्हे दाखल करावेत पण आम्ही स्मशानभूमीचे काम काही थांबवणार नाही. त्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवून घेण्यात आले वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर ते काम चालू करण्यात आले व पूर्ण करण्यात आले या कामी अजित पवार, संभाजी होळकर श्री पुरुषोत्तम जगताप व प्रमोद काकडे यांचे मोठे सहकार्य लाभले तसेच गावातील सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड पांडुरंग भोसले, ज्येष्ठ ग्रामस्थ अशोक आवारे, युवा कार्यकर्ते तुषार सकुंडे ग्रामविकास अधिकारी नरसिंग राठोड यांच्या परिश्रम व पाठपुराव्यामुळे आपण हे काम करू शकलो व लवकरात लवकर स्मशानभूमी चालू करण्यात येईल असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले. त्या ठिकाणी आपण दोनशे वृक्ष लागवड केलेली असून जवळपास आपल्याला प्रशस्त दोन ते अडीच एकर जागा उपलब्ध झालेली आहे पुढे आपण त्या ठिकाणी असे विधिक्रिया घाट बांधकाम करणार आहोत त्याबाबत आपण जलसंपदा विभाग कालव्या वरती आपल्याला विस्तारीकरणांमध्ये उतरण्यासाठी जागा करून देणार आहे व नवीन स्मशानभूमीसाठी २५ लाखाचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे व १० लाखाचे अंतर्गत स्मशानभूमीसाठी पेवर ब्लॉक बसणार आहेत. टप्प्याटप्प्याने स्मशानभूमीतील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावातील सर्वच कामे आम्ही सर्वांच्या सहकार्याने व विश्वसात घेऊन आजपर्यंत पूर्ण करू शकलो एवढेच काम बाकी होते तेही शेवटच्या टप्प्यात करू शकलो याचा सार्थ अभिमान ग्रामपंचायत पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला तसेच गावातील सर्व ग्रामस्थ महिला युवक व पंचक्रोशी मधील नागरिक वाघळवाडीमध्ये खूप वर्षांचे प्रश्न मिटलेले आहेत व न भूतो न भविष्य असा गावचा विकास झालेला आहे असे बोलत आहेत.