सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा : सातत्य आणि चिकाटी च्या जोरावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत करंजे तर्फे मेढा गावचे सुपुत्र कुमार अनिकेत किसन धनावडे यांची सशस्त्र सीमा दलामध्ये निवड झाली आहे.
राष्ट्रीय सेवा आणि देशभक्ती चे प्रतीक म्हणजे सीमा सुरक्षा दल. भारताच्या नेपाल - भूतान सीमेवर तैनात असलेल्या या सैन्य दलाच्या ऑगस्ट २०२१ च्या भरती परीक्षेमध्ये Staff Selection Commission च्या माध्यमातून जुलै 2021 मध्ये निघालेल्या जाहिराती नुसार ऑगस्ट महिन्यात परीक्षेसाठी फॉर्म भरला. त्याच काळात पोलिस भरतीमध्ये नोव्हेबर महिन्यात चार मार्क्स नी संधी हुकली. आलेल्या अपयशाने न खचता अभ्यास अधिक नेटाने चालू ठेवून डिसेंबर महिन्यात सीबीआयटी ऑनलाईन पेपर क्रॅक केला मे महिन्यात JNPT उरण ला येथे मैदानी चाचणी पास झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यात नागपूर येथे मेडिकल झाली. पुढील महिन्यात ट्रेनिंग प्रोग्राम सुरु होणार आहे.
संकष्टी चतुर्थी निमित्त श्री गणेश देवस्थान करंजे येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते गणपत धनावडे, मारुती धनावडे, अरविंद धनावडे यांच्या हस्ते अनिकेत धनावडे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष निलेश धनावडे, अजित साखरे, वसंत धनावडे, भास्कर धनावडे, सर्व युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
मा. आमदार छ. शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी युवा वर्गाला दिशा देणारा अनिकेत असे कौतुक केले. इलेव्हण स्टार क्रिकेट क्लब करंजे, ग्रामस्थ मंडळ करंजे यांनी विशेष सत्कार केला.