सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
उद्योजक आर एन शिंदे यांनी उभारलेल्या अक्षय शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील वंचित घटनांना होत असलेली मदत कौतुकास्पद असून आर एन बापू हे बारामतीकरांसाठी 'टाटा' च असल्याचे मत बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे व्यक्त केले.
सोमेश्वरनगर येथे श्रीगोंदा तालुक्यातील अग्नीपंख फाउंडेशनच्या वतीने उद्योजक आर एन शिंदे, आशालता शिंदे व श्रीगोंदा येथील सुवर्णपदक विजेती अश्विनी दळवी यांच्या सत्कार समारंभात इंगळे बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सपोनि सोमनाथ लांडे, संजय शिंदे, अग्नीपंख चे अध्यक्ष बाळासाहेब काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीगोंदा येथील अग्नीपंख फाउंडेशनच्या वतीने श्रीगोंदेकरांची प्रेरणा सायकल वारीचे श्रीगोंदा ते सोमेश्वरनगर असे ८५ किमी चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५० सायकलस्वार श्रीगोंदा ते सोमेश्वरनगर दरम्यान सायकल वरून प्रवास करत समाजात उल्लेखनीय कार्य काढणाऱ्या आर एन शिंदे, आशालता शिंदे व खेळाडू अश्विनी दळवी यांचा सत्कार केला. इंगळे पुढे म्हणाले, कुठल्या कामात जिद्द आणि चिकाटी असेल तर त्यात हमखास यश येते हे आर एन बापूंनी करून दाखवले आहे. समाजासाठी झटणारे, तळागाळातील लोकांना मदत करण्याची दानत ही फक्त बापूंच्यात असून ते बारामतीकरांचे टाटा असल्याचे मत इंगळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सुनील महाडीक व अश्विनी दळवी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद मचाले व बाबूलाल पडवळ यांनी केले. प्रास्ताविक विठोबा निंबाळकर तर आभार संतोष शेंडकर यांनी मानले.