भोर ! अनंतराव थोपटे महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन मुले कुस्ती स्पर्धा संपन्न

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर येथील अनंतराव थोपटे महाविद्यालय प्रांगणात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व अनंतराव थोपटे महाविद्यालय भोर यांच्या संयुक्त विद्यमाने भरवण्यात आलेल्या अंतर महाविद्यालयीन मुले कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.स्पर्धेसाठी १२५ स्पर्धकांनी भाग घेतला होता.
      अंतर महाविद्यालयीन मुले कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती बाळासाहेब थोपटे, प्राचार्य प्रसन्नकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.या स्पर्धेमधून विजेतांची विभागीय स्तरासाठी निवड होणार आहे.यावेळी प्रशिक्षक म्हणून पै. मोहननाना खोपडे ,राजेंद्र वरे ,माऊली खोपडे तर शारीरिक शिक्षण संचालक डॉ.प्रा..संजय वाडकर व संजय चोर उपस्थित होते.
To Top