भोर ! माऊलींच्या जयघोषात भोर तालुका दुमदुमला :दिंड्यांचे आळंदीकडे प्रस्थान, शहरात मान्यवरांच्या हस्ते स्वागत

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
 भोर तालुक्यातून कार्तिकी एकादशीसाठी आळंदीला दिंड्यांचे ज्ञानोबा माऊली तुकाराम,चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू असा जयघोष करीत टाळ मृदंगाच्या गजरात तालुका दुमदुमून गेला असून पायीवारी पालखी सोहळ्याचे आलांदिकडे प्रस्थान झाले.यावेळी विविध दिंड्यांचे स्वागत भोर शहरात मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आले.
      श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळा होत असल्याने सोहळ्यासाठी भोर तालुक्यातून रायरेश्वर धर्मादाय संस्था अंबवडे विभाग, ज्ञानेश्वर सेवा दिंडी खानापूर भोर विभाग तसेच रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथून सद्गुरु लक्ष्मण महाराज मालुसरे सत्संग पालखी सोहळ्यांचे प्रस्थान झाले आहे.पालखी सोहळ्यांचे शहरातील चौपाटी व राजवाडा चौक येथे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तसेच राजगड ज्ञानपीठाच्या सचिवा स्वरूपा थोपटे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व माऊलींचे पालखी सोहळे आळंदीकडे मार्गस्थ झाले.यावेळी माजी जि. प.सदस्य गीतांजली आंबवले, ह.भ.प नामदेव महाराज किंद्रे,मनीषा राजीवडे,रामदास जेधे ,दिलीप देशपांडे ,नितीन झेधे, ज्ञानेश्वर धोंडे ,पंढरीनाथ भिलारे ,रामदास कुंभार,ज्ञानोबा रवळेकर,कीर्तनकार पंढरीनाथ गर्जे,रामचंद्र थोपटे, बाळू थोपटे ,पांडुरंग गोरे ,बाळासाहेब सोनवणे आदींसह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते.
To Top