कौतुकास्पद ! एकाच वेळी दोन परिक्षा उत्तीर्ण : बारामती तालुक्यातील होळ येथील श्रद्धा होळकर यांचे राज्यकर निरीक्षक व मंत्रालय कक्ष अधिकारीपदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे 
नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा  सन 2021-22 परिक्षेचा निकाल लागला असून , यामध्ये श्रद्धा सुरजीत होळकर (कुलट) यांची राज्यकर  राज्यकर निरीक्षक (S.T. I) व सहायक कक्ष अधिकारी (A. S. O)  मंत्रालय यापदी  खुल्या प्रवर्गातून चांगल्या क्रमांकाने निवड झाली आहे. 
           या पूर्वी हि राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज सब इन्स्पेक्टर)  यापदी निवड झाली होती .त्याचे शिक्षण पुणे येथील मॉर्डन कॉलेज मधुन  BSC first class  झाले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम 
Trix  अभ्यासिका बारामती येथून झाले आहे .या निरा पोलिस दुरक्षेत्राचे सहायक पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन होळकर यांचा सूनबाई आहेत. त्यांचा निवडीबद्दल सर्व राजकीय व सामाजिक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
To Top