बारामती ! सुनील जाधव ! वडगाव निंबाळकर-मुढाळे येथे नीरा डाव्या कालव्याच्या पुलावर वाहतूक होतेय जाम : ठेकेदार स्वतःच्या सवडीने करतोय थोडे थोडे काम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर  व मुढाळे,लोणी इतर छोट्या-मोठ्या वाड्या -वस्त्यांना  व गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम रेंगाळले आहे. मागील अनेक दिवसापासून सुरु झालेलं काम अजून हि पूर्ण झाले नाही. 
          जुना पूल मोठ्या प्रमाणात पडझज झाल्यामुळे यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. ऊस कारखाना चालू असल्यामुळे ऊस गाडी, ऊस ट्रॅक्टर वाहतूक होत असल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे. तसेच दळणवळणासाठी वडगाव निंबाळकर मध्ये येणाऱ्या   ग्रामस्थांना, शालेय विद्यार्थ्यांना प्रवास करताना या  पुलावरती  अडचणींना सामना करावा लागत आहे.  पूल बांधण्याचे काम  गतीने होणे आवश्यक होते. मात्र, त्यात दिरंगाई झाली. अद्यापही या ठिकाणी काम पूर्ण न झाल्याने पुलाचे काम रखडले आहे. या पुलाचे काम लवकर झाल्यास परिसरातील नागरिक, ऊस तोडी कामगार, शालेय विद्यार्थी, यांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पुलाचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
To Top