भोर ! स्पर्धा परीक्षांसाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
भोर : संतोष म्हस्के
 भोर शहरात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तसेच संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा परीक्षा व पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात स्पर्धा परीक्षांसाठी महेश कोगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
      यावेळी संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम ओंबळे पंडित गोळे ,एकनाथ अवचरे,योगेश तोरसे, पोलीस कॉन्स्टेबल मंगेश मोझर, वैभव कंक ,सोन्या वालगुडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.

To Top