सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
केळवडे ता. भोर येथे ग्रामीण डाक सेवक( पोस्टमन) म्हणून कार्यरत असणारे अशोक नामदेव भांडवलकर वय -५७ हे पत्र वाटप करण्यासाठी जात असताना रस्ता ओलांडताना दुचाकीने ठोकर दिल्याने जागीच मृत्यू झाला.भांडवलकर यांचा वाढदिवसाच्या दिवशी अपघाती मृत्यू झाल्याने तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवार दि.९ दुपारी अपघात घडल्यानंतर भांडवलकर यांना नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.भांडवलकर यांचा बुधवार दि.९ वाढदिवस होता आणि याच दिवशी त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याचीही विशेष घटना आहे.पुढील तपास राजगड पोलीस करत आहेत.