सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
पुणे सातारा महामार्गावरील धांगवडी ता भोर येथील उड्डाण पुलावर लेन नं.१ वर गुरुवार दि.८ रात्री अंधारात उभे असलेल्या ट्रकवर मागील बाजूने कारने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक ठार एक जखमी झाल्याची घटना घडली.याबाबत गजाननराव भोगावकर यांनी ट्रक चालक विरोधात राजगड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.८ रात्री १ च्या सुमारास मौजे धांगवडी गावचे हददीत पुणे सातारा महामार्गावरील उड्डाणपुलावर लेन नं.१ एक ट्रक टीएन ८८ यु ९०११ ट्रकवरील चालक मनिकंधन व्हि वेट्रीवेल वय -२७ वर्षे धंदा डायव्हर रा. ८/५ ए ईनाम बेकनाथम श्रीराम सामु तेरम पोस्ट थोटीयाम जिल्हा तिरूचिल्लापल्ली तामिळनाडु याने ट्रकला कोणत्याही प्रकारचा रिफलेक्टर लावलेला नसल्याने तसेच धोकादायकरित्या रहदारीस अडथळा निर्माण होऊन लोकांचे जिवीतास धोका निर्माण होईल अशा पध्दतीने ट्रक उभा केला होता. रात्री अंधारात सदर ट्रक उभा असल्याचे मारुती बलेनो एमएच ०९ डी एक्स २६४१ मधुन जानारे नरेद्र वामन देशपांडे वय-६२ रा.स्नेहल को ऑप हाउसिंग सोसायटी हिम्मतबाहाददर परिसर कोल्हापुर यांच्या गाडीची ट्रकला मागील बाजूने जोरदार धडक बसली.यात कार चालक अक्षय युवराज पाटील याला हाताला किरकोळ दुखापत झाली.तर गाडीचे मोठे नुकसान होऊन नरेद्र वामन देशपांडे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गजाननराव भोगावकर यांनी राजगड पोलिसात ट्रक चालक मनिकंधन व्हि वेट्रीवेल विरोधात तक्रार दिली असून अधिकचा तपास राजगड पोलीस करीत आहेत.