बारामती ! शालेय क्रिडा स्पर्धेत सोमेश्वर विद्यालयाचे यश : श्रेयाची जिल्हास्तरावर निवड तर आयुषने तालुकास्तरावर पटकावला द्वितीय क्रमांक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद पुणे व जिल्हा क्रिडा विभाग यांच्या वतीने आयोजित शालेय क्रिडा स्पर्धेत सोमेश्वर विद्यालयातील विद्यार्थांनी योग, बुद्धिबळ, कुस्ती मैदानी स्पर्धा यामध्ये घवघवीत यश संपादित केले
      तालुका बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात श्रेया रमेश जगताप हीने यश मिळवत जिल्हा स्तरावर निवड झाली. १९ वर्षे वयोगटामध्ये शंभूराज गणेश गायकवाड व पार्थ सुधीर साळवे यांनी जिल्हा स्तरावर झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत यश संपादन केले. शंभूराज गणेश गायकवाड याने प्रथम क्रमांक मिळवून सोलापूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत निवड झाली. १९ वर्षे वयोगटामध्ये पार्थ सुधीर साळवे योगासन या क्रिडा प्रकारात बारामती तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरांवर निवड झाली. १५०० मीटर धावणे १७ वर्षे वयोगटात आयुष युवराज खोमणे याने व्दितीय क्रमांक पटकावत जिल्हा स्तरीय स्पर्धेत निवड झाली. 
कुस्ती स्पर्धेत यश पवार व आदेश नवनाथ धायगुडे याने प्रथम मिळविला. कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटामध्ये नेहा रासकर हिने १०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर
         सचिव भारत खोमणे, प्राचार्य बाळासाहेब मिंड, उपप्राचार्य अनिल भोसले, क्रिडाशिक्षक दिलीप वाडकर  यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.


छायाचित्र : सोमेश्वर विद्यालयातील यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक
To Top