कौतुकास्पद ! ज्ञानेश्वरी रमेश लवटे हिचा जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
राजगुरुनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मोरगावच्या ज्ञानेश्वरी रमेश लवटे ,वय वर्ष १४ वयोगटात दुसरा क्रमांक पटकावला. 
    यापुर्वी बारामती येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत हिने प्रथम क्रमांक पटकावला होता . ज्ञानेश्वरी ही मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयात मोरगाव या शाळेत इयत्ता सहावी मध्ये शिकत असून, कुस्तीचे मार्गदर्शन गुरुकृपा संकुल कुस्ती स्पर्धा मार्गदर्शन केंद्र मोरगाव येथून डी वि नेवसे सरांच्या कडून मिळाले आहे. या यशाबद्दल तिचा मोरगाव ग्रामस्थ व ग्रामपंचायत मोरगाव यांच्याकडून सत्कार करण्यात आला, व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
To Top