शाळा व महाविद्यालयीन स्तरावर नवीन मोटार अपघात कायदा प्रबोधनाची गरज ! मुलांच्या चुका येऊ शकतात पालकांच्या अंगलट, मोटार वाहन कायदा काय सांगतो : ॲड. गणेश आळंदीकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
ऱस्त्यावरील अपघातांची संख्या कमी होण्यासाठी केंद्रसरकारने २०१९ साली कडक कायदा केला पुर्वीच्या दंडाच्या रकमेत दहापट दंड वाढवला मात्र अपघातांची व मृतांची संख्या अद्याप कमी होताना दिसत नाही .. त्यामुळे या कायद्याची कडक अंमलबजावणी व समाजप्रबोधन तसेच शालेयस्तरावर ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे . जेणेकरून भावी पिढी या अपघातापासुन काही प्रमाणात वाचु शकेल.
        नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या आकडेवारी नुसार सन २०२० साली ३६८८२८ रस्ते अपघात नोंद झाली होती मात्र सन २०२१ साली त्यात भर पडुन ४२२६५९ ईतके अपघात झाले मृत्युचा दर ही प्रतिहजारी ०.४५ वरुन ०.५३ वर गेला ..२०२० साली या रस्ते अपघातात १४६३५४ जणांचा मृत्यु झाला होता तर २०२१ मधे १७३८६० जणांचा मृत्यु रस्ते अपघातात झाला आहे म्हणजेच १८ .८ टक्क्यानी मृतांची संख्या वाढली आहे. 
        केंद्र सरकारने केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालय द्वारे नितीन गडकरी च्या मार्गदर्शनाखाली मोटार अपघात कायदा कडक केला त्यात अनेक कडक तरतुदी केल्या आहेत. त्यामधे  अधिकृत लायसन्स शिवाय गाडी चालवल्यास ५०००/- दंड व लायसन्स जप्त असताना गाडी चालवल्यास १००००/- दंड आहे ..पुर्वी ५०० होता ...२०१७ च्या रस्ता वाहतुक मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार दर वर्षी ५ लाख अपघात होतात त्यापैकी दीड लाख नागरीकाना मृत्युला सामोरे जावे लागते ...तांत्रीक तृटीवाली वाहने माघारी घेण्याची तरतुद आहे ...दारु पीऊन गाडी चालवली तर २००० वरुन १००००/- व ६ महिने कैद पुन्हा गुन्हा केल्यास १५०००/- दंडाची तरतुद आहे ..मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्यास ५०००/- दंडाची तरतुद आहे ..वाहन कंपन्याना देखील सर्व मानके न पाळल्यास १०० कोटीपर्यंत दंड ... एक वर्षापर्यंत शिक्षेची तरतुद आहे रस्त्याच्या कंत्राटदाराने जरी मानकाचे उल्लंघन केले तर त्याला एक लाखापर्यंत दंडाची तरतुद आहे. कलम १९६ नुसार  विम्या शिवाय वाहन चालवल्यास २००० पर्यंत दंड ...कलम १९४ ब नुसार सीट बेल्ट शिवाय गाडी चालवल्यास १०००/- दंड आहे .शर्यती अथवा वेगात गाडी चालवताना पुर्वी ५०० दंड होता आता ५०००/- करणेत आला आहे जर ॲंबुलंस सारख्या गाड्याना रस्ता प्राधान्याने न दिल्यास १००००/- रु दंड आहे ..परमीट शिवाय वाहन चालवल्यास आता १००००/- रु दंडाची तरतुद आहे .प्रमाणापेक्षा वजन जास्त भरल्यास प्रती टन २०००/- दंडाची तरतूद आहे .....
          मोटार अपघात  कायदा २०१९ मधे कलम १९९ अ नुसार  अतिशय महत्वपूर्ण तरतुद करण्यात आली असुन यामधे जर एखाद्या अल्पवयीन मुलाने विना परवाना  गाडी चालवुन काही गुन्हा केला तर त्या गुन्हयाला त्या मुलाच्या पालकाना जबाबदार धरले जाईल व सदर गुन्हा त्याचे पालकानी त्यांच्या परवानगीनेच  केला आहे असे न्यायालय गृहीत धरेल .या गुन्हयापोटी त्या पालकाना २५०००/- दंडाची तरतुद असुन सोबतच तीन वर्षापर्यंतची  शिक्षा देखील होवु शकते तसेच १२ महिने त्या वाहनाचा नोंदणी ( रजिस्ट्रेशन ) रद्द केले जाईल .तसेच असा गुन्हा अल्पवयीन मुलाने केल्यामुळे त्याला वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालक परवाना मिळणार नाही तसेच या अल्पवयीन मुलाला बाल गुन्हेगार कायद्यानुसार शिक्षा होईल.
To Top