वाई ! खावलीच्या नवलाई देवीची यात्रा १२ आणि तारखेला भरणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी 
वाईच्या पश्चिम भागातील खावली गावचे ग्रामदैवत जागृत देवस्थान   आणी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान  व नवसाला पावणारी नवलाई देवीची यात्रा डिसेंबरच्या दि.१२ आणी १३ तारखेला भरणार असल्याची माहिती यात्रा कमेटीने दिली आहे .
           वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील खावली गावात नवलाई देवीचे भव्य मंदिर आहे या देवीची मनोभावे पुजा करणारे राज्यात लाखो भाविकांची संख्या आहे येथे येणारे भक्तगण आपल्या प्रापंचिक अडचणी आईच्या दरबारात  मांडतात .तर काही भाविक आईच्या चरणी आपल्या इच्छा पूर्ती साठी नवस करतात आणी अनेक भक्त केलेला नवस फेडण्या साठी येतात .येथील नवलाई देवी हे जागृत देवस्थान असल्याने येथे भरणार्या वार्षिक यात्रेत भाविकांची मोठी गर्दी असते .येणार्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून येथील यात्रा कमेटी ग्रामस्थांच्या मदतीने नेहमीच प्रयत्नशील असते .
To Top