वाई ! योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाने उसाचे आधिक उत्पादन शक्य : राऊत

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : दौलतराव पिसाळ
ऊस पिकामध्ये बेणे निवड ते खत व किड रोग व्यवस्थापन पर्यंत योग्य व अचूक नियोजन केल्यास ऊस पिकाचे आधीक उत्पादन शक्य आहे.तरी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन श्री विजयकुमार राऊत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा यांनी केले.
          महाराष्ट्र शासन कृषी विभाग व सिंजेंटा इंडिया लि यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा आयोजित ऊस उत्पादकता वाढ अभियान अंतर्गत पाचट व खोडवा व्यवस्थापन या परिसंवादात ते बोलत होते.यावेळी त्यांनी पाचट न जाळता ते शेतातच कुजवावे असे आवाहन केले 
       यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ अंकुश चोरमुले यांनी ऊस पिकाचे लागवड तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. पाचट  कसे कुजवावे व खोडवा व्यवस्थापन करताना मुख्य बाबी कोणत्या याविषयी सुद्धा सखोल मार्गदर्शन केले.शेतकऱ्याच्या सर्व शंकांचे देखील निरसन यावेळी करण्यात आले.
  श्री.चंद्रकांत गोरड उपविभागीय कृषी अधिकारी वाई यांनी आपल्या मनोगतमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना ऊस प्रक्रिया उद्योग जसे गूळ तयार करणे यासारख्या उद्योगाकडे वळण्याचा सल्ला दिला व त्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
 अजित खोटे  बिझनेस मॅनेजर सिंजेटा यांनी कंपनी विषयी माहिती दिली.तर अजित बोंगाणे बिझनेस लीड यांनी सिंजेटा कंपनीच्या नवीन उत्पादनाविषयी माहिती दिली
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्रशांत शेंडे तालुका कृषी अधिकारी वाई यांनी करताना या कार्यक्रमाची आवश्यकता नमूद केली.तसेच पाचट व खोडवा व्यवस्थापनाचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले व त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण या योजनेत सहभागी होण्यास सांगितले.
       सूत्र संचालन श्री निखिल मोरे कृषी सहाय्यक यांनी केले.श्री रवींद्र बेलदार मंडळ कृषी अधिकारी वाई यांनी आभार प्रदर्शन केले.
  यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी श्री चंद्रकांत गोरड,उमेश सरपरे   टेरीटरी मॅनेजर सिंजेंटा ,कृषी पर्यवेक्षक श्री.बनसोडे,श्री. यमगर , श्री प्रदीप देवरे बी टी एम,श्री योगेश जायकर ए टी एम,सौ सुप्रिया पवार सरपंच उडतरे, मा.दिलीप बाबर मा. जि प सदस्य  सोसायटी चेअरमन व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
To Top