Phaltan breaking ! स्वराज रणवरे ! फलटण-नातेपुते भागातील क्रिप्टो करन्सी, शेअरमार्केटचेगुंतवणूकदाराचे परतावे लटकलेले : पैसे मागायचे कोणाला?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
फलटण : प्रतिनिधी
सातारा-सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी,शेअरमार्केटने भुरळ घातले होते. परंतु फलटण-माळशिरस मधील काही कंपनीने गुंतवणूकदाराचे परतावे देण्यासाठी लटकलेले असल्याचे दिसून येत आहे. गुंतवणूकदार कोणाकडे पैसे मागावे असा अनेक ठेवीदार प्रश्न निर्माण झाला आहे.संचालकांकडुन गुंतवणूकदारांना भूलथापा देण्यास झाली असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
          सोमेश्वर रिपोर्टर च्या बातमीने अनेक गुंतवणूकदार सावध झाल्याने आपल्या कष्टाचा पैसा योग्य पद्धतीने बँकेमध्येच  गुंतवणूक करणे पसंत  करत असल्याचे पहायला मिळत आहे.सध्या फलटण, माळशिरस, दहिवडी,बारामती तालुक्यातील अनेक नागरिकांना एजंटांच्या माध्यमातून संपर्क केला जात आहे .संचालक मंडळीने  गुंतवणूकदाराचे अनेक व्हाट्सअप ग्रुप तयार करून संचालक आपल्या स्वतःचे  ऑडिओ क्लिप द्वारे  गुंतवणूकदार  यांना विश्वासात घेण्यासाठी अगतिकपणे थोडे दिवस सहकार्य करावे अशी  विनंती करत  आहे ,आपण गुंतवणूक केलेली रक्कम परत देण्याची  मागणी करू नका  अशी आर्जव केली जात आहे .
            दरम्यान क्रिप्टो करन्सी,शेअरमार्केटचे केंद्र बिंदू  माळशिरस भागातील नातेपुते असल्याचे दिसून येत आहे. या गावातील सैरभैर झालेल्या  काही संचालकांनी पंधरा दिवसांपूर्वी लोणावळा येथील एका नामांकित पंच तारांकित  हॉटेलमध्ये एजंट लोकांची  तातडीने एक बैठक घेतली असून यावेळी संचालकाकडून सांगण्यात आले की आपली कंपनी शासकीय आहे  व केंद्र सरकार मान्यता प्राप्त झाली असून आपणाला घाबरून जाण्याची गरज नाही .अशा प्रकारच्या  भूलथापा एजंटला संचालका कडून सांगितल्या  जात आहेत.
         तसेच फलटणच्या काशीदवाडी , सस्तेवाडी, विडणी  गिरवी ,दुधेबावी परिसरातील एजंटांनी अनेक लोकांना विविध शेअरमार्केटिंग इतर ठिकाणी करोडो रुपयांची गुंतवणूक करायला भाग पाडले आहे  आता परतावा बंद झाल्यावर वेगवेगळी कारणे देत पैसे देण्याचे टाळत असल्याने  हे एजंट गुंतवणूकदारांची फसवणूक करीत आहेत .
------------------
दामदुप्पटच्या पायी कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे ८३ हजार लोकांनी सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अशी माहिती पुढे येत  असून गुंतवणूकदाराच्या परतावे बंद  केल्याचे पहायला  मिळत आहे. असेच प्रकार सातारा जिल्ह्यात घडण्याची  वेळ येऊ लागली आहे. या बाबत सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख काय भुमिका घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.


To Top