सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील आसरे गावच्या माहेरवासीन आणि पसरणीच्या सासरवाशीन असलेल्या सौ .राधिका तुषार साळुंखे वय ३२ यांनी नवरा सासरा आणी सासुच्या जाचाला कंटाळून पसरणी येथील आळेवाटा परिसरातील बेंदार शिवारातील ४० फुट खोल पाणी असलेल्या विहिरीत जाचहाट सहन न झाल्याने आत्महत्या केल्याने आसारे गावात खळबळ उडाली आहे .
वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ नवरा तुषार मानसिंग साळुंखे वर ३८ आणी सासरा मानसिंग कृष्णा साळुंखे सासरे यांना अटक केली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार राधिका व तुषार या दोघांचा प्रेम विवाह १५ |१२ |१७ ला क्षेत्र आळंदी येथे झाला होता .त्यांना एक दोन वर्षाचा मुलगा आहे .लग्ना नंतर या
दोघांचा प्रपंच सुरळीत चालला होता पण नंतर नंतर नवरा तुषार सासरा मानसिंग आणी सासु मिना या तिघांनी एकत्रीत येवुन राधिका यांना सतत मारहाण करणे उपाशी ठेवणे व चार चाकी वाहन घेण्या साठी आणी सोन्याची साखळी घेण्यासाठी माहेरहुन लाखो रुपये घेऊन ये तरच आम्ही घरात ठेवु असे सांगून सतत घरातून हाकलुन देणे असे सतत प्रकार सौ.राधिका सोबत घडत होते पण राधिका यांच्या माहेरची परिस्थिती जेमतेम असल्याने माहेरचे लोक नवर्याच्या या मागणी पुढे हतबल झाले होते .त्यांनी या गंभीर घटनेची माहिती वाई पोलिसांना दि.१५ |१० |१८ रोजी दिली होती त्या वेळी वाई पोलिसांनी नवर्यावर गुन्हा देखील दाखल केले होता पण सौ.राधिका यांना नवर्या कडेच नांदायचं होत म्हणून आपसात तडजोड करुन नवर्याने या पुढे कसलाही त्रास देणार नाही असे स्टॉप पेपरवर लिहुन दिले होते .आणी पुन्हा नव्याने सौ.राधिका यांनी पुन्हा प्रपंच करण्यास सुरुवात केली .
पण नवरा सासु सासरे यांच्यात कसलाही फरक पडला नाही पुन्हा राधिकाचा छळ सुरु झाला .पण हा होत असलेला छळ सहन न झाल्याने अखेर सौ. राधिकाने दि.७ रोजी अचानक घर सोडले आणी पसरणी येथील आळेवाट परिसरातील धोम उजव्या कालव्याच्या बाजुला असणार्या बेंदार शिवारातील विहिरीत उडी टाकुन आत्महत्या केल्याने आसारे गावात एकच खळबळ उडाली आहे .त्याच बरोबर संतापाची लाट उसळली आहे .
.राधिका या घरातुन अचानक बेपत्ता झाल्याची माहिती वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे यांना समजताच त्यांनी हवलदार शिवाजी वायदंडे आणी हवलदार पवार यांना बेपत्ता राधिकाचा शोध घेण्याचे आदेश दिले होते या दोघांनी मोबाईल लोकेशनचा आधार घेत ते सौ .राधिकाच्या मृतदेहा पर्यंत पोहचले .पण विहिर खोल असल्याने व त्यात पाणी साठा भरपूर असल्या मुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी येत असल्याने अखेर महाबळेश्वर येथील ट्रॅकर्सच्या अनिल केळगाणे, सुनील भाटिया, अनिल लंगी, तेजस जवळ, सौरभ गोळे, सचिन ङोईफोडे यांच्या पथकाला बोलावून त्यांच्या मदतीने राधिकाचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले .या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे .