जावली ! ओंकार साखरे ! तालुक्यात ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ११५ उमेदवार निवडणूक रिंगणात : ४ ग्रामपंचायती बिनविरोध, मोरघर, सोमर्डी, ओझरे, करहर आणि कुसुंबी लढतीकडे सर्वाचे लक्ष

Admin
3 minute read
मेढा : प्रतिनिधी
मेढा - जावली तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या निवडणूकी मध्ये माघार घेण्याच्या दिवशी सरपंच व सदस्य प्रत्येक एक अर्ज अवैध ठरला होता . तसेच सरपंदासाठीच्या १६ तर सदस्य पदाच्या ४५ जणांनी माघार घेतल्याने १५ पैकी ११ ग्रामपंचायातीसाठी सरपंच पदासाठी २५ तर सदस्य पदासाठी ९० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत.
              निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये सदस्य संख्येपेक्षा एकही अर्ज जादा दाखल न झाल्यामुळे  रिटकवली, रामवाडी, वाकी या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहेत. तर केळघर त. मेढा येथे सरपंच पदाच्या ५ पैकी ४ अर्ज माघार झाल्याने बिनविरोध झाली आहे. सध्याच्या निवडणूकीत सरपंचपद हे जनतेतून निवडून द्यायचे आहे त्यामुळे तीन गावे सोडली तर बहुतांश गावात दुरंगी तर वालुथ मध्ये तिरंगी व भोगवली तर्फ कुडाळ येथे चौरंगी लढत पहायला मिळणार आहे.  सदस्य संख्या ७ असणाऱ्या सर्व ग्रामपंचायती असून कुसुंबी ग्रामपंचायत ९  सदस्यांची आहे. 
             केळघर त. मेढा, भोगवली त. कुडाळ व घोटेघर या तीन ग्रामपंचायतीमध्ये एकून आठ सदस्यांच्या जागा अर्ज प्राप्त न झाल्याने रिक्त राहील्या आहेत. मोरघर , सोमर्डी, ओझरे, करहर आणि कुसुंबी येथे समोरासमोर लढती होणार असल्याने या गावांची चर्चा रंगली आहे. १५ गावांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सरपंच पदाच्या १५ जागांसाठी ४६ अर्ज प्राप्त झाले होते परंतु प्रत्यक्षांत २५ उमेदवार निवडूक लढवित आहेत. तसेच १०७ सदस्य पदांसाठी १९० अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी ९० उमेदवार निवडणूक लढवित आहेत. 
             निवडूकीच्या रिंगणात असलेले सरपंच ( सदस्य ) गावनियहाय संख्या पुढील प्रमाणे मोरघर 2 ( १२), सोमर्डी-२( १ ४ ), आखाडे २ ( ८), ओझरे 2( १२), रूईघर २( ४ ), शिंदेवाडी २ ( २ ), वालुथ ३( ६ ), करहर २ ( १ ४ ), भोगवली तर्फ कुडाळ  ४ ( ४ ) ,  कुसुंबी २ ( १२ ), घोटेघर २ ( २ ), असे उमेदवार निवडणूक लढवित आहेत. दरम्यान निवडणूकीसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
To Top