बारामती ! थोपटेवाडीच्या महिलांचे स्वावलंबीकडे पहिले पाऊल : ५६ महिला बनल्या स्वयंपूर्ण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम--------
कोऱ्हाळे : प्रतिनिधी            
थोपटेवाडी ग्रामपंचायत व शिवाणी टेलरिंग सेंटर प्रणित ब्युटी पार्लर ट्रेनिंग सेंटर च्या वतीने १४ व्या व १५ व्या वित्त आयोगातून महिलांना शिलाई मशीन व ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा एक महिना कालावधीचा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
           यात  ३५ महिलांना शिलाई मशिनचे व २१ महिलांना ब्युटी पार्लर चे  प्रशिक्षण घेतले . या प्रशिक्षण वर्गाचे प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम ग्रामपंचायत थोपटेवाडी येथे पार पडला यावेळी .. सरपंच रेखा बनकर, उपसरपंच राणी पानसरे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव कोरडे, संतोष खांडेकर, कमल थोपटे, शुभांगी अडागळे,  ग्रामसेवक प्रियांका जाधव , वर्षा कडाळे , दत्ता बनकर अक्षय तावरे,  प्रशिक्षिका अनिता पानसरे व प्रनिता घाटे उपस्थित होते.
        उपसरपंच राणी पानसरे यावेळी म्हणाले की, ग्रामीण भागातील महिला, तरुणी यांच्या हातामध्ये अनेक कौशल्य आहेत, परंतु  ती दाखविण्याची संधी त्यांना मिळत नसल्यामुळे त्या मागे पडतात, त्यामुळे त्या स्वता स्वावलंबी बनव्या तसेच घरच्या घरी व्यावसायातून प्रगती व्हावी व स्वतःच्या पायावर उभे राहावे या करीता ग्रामपंचायतच्या १४व्या व १५व्या वित्त आयोगा तुन ग्रामीण भागातील  महिलांना  शिलाई मशिनचे व ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण दिले असून, त्याचा फायदा महिलांना होणार असल्याचे  उपसरपंच यांनी सांगितले.
To Top