सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोरटेवाडी(ता. बारामती)येथे सोन्याचे दागीने पॉलीश करुन देण्याच्या बहाण्याने एका महिलेचे एक तोळे सोने लुटल्याची घटना गुरुवार( दि.८) रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान उघडकीस आली.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नसली तरीही घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परीसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात असून संशयितांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या वर्षभरात सोमेश्वरनगर परीसरात वारंवार छोट्या- मोठ्या चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. गेल्याच महिन्यात वाणेवाडी येथील चार दुकाने चोरट्यांनी फोडली होती. तर चोपडज येथे थेट सरपंचांच्याच घरी चोरी करत १० तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते. वास्तविक दागिने पॉलिश करण्यासाठी दिडशे ते दोनशे रुपये खर्च येतो. अनोळखी नागरीकांकडे दागिने पॉलिश करण्यासाठी न देता अधिकृत व्यक्तींकडूनच करणे गरजेचे आहे. मात्र ग्रामीण भागातील एकट्या महिलांना गाठून फसवण्याचे प्रकार सुरु आहेत. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश शेलार करत आहेत.