सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई प्रतिनिधी, दि. ७ :
वाई तालुक्यातील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या आणी तालुक्याचे भविष्यात भवितव्य घडविणार्या ७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७६ अर्ज मागे घेतले ५२ जागांसाठी ९६ उमेदवारांचे १३८ अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर ६ सरपंच पदासाठी १७ उमेदवारांचे १९ अर्ज शिल्लक आहेत. गोवेदिगर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी आम्रपाली सुभाष चव्हाण यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत फक्त घोषणाच बाकी आहे .
वाई तालुक्यातील राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या भुईंज ग्रामपंचायतच्या १७ सदस्य पदांच्या साठी ३६ उमेदवारांचे ३९ अर्ज आज शिल्लक राहिले आहेत. तर ३० अर्ज मागे घेतले सरपंच पदासाठी ५ उमेदवारांचे ६ अर्ज शिल्लक आहेत. कवठे ग्रामपंचायतच्या ११ सदस्य पदांच्या साठी २६ उमेदवारांचे २६ अर्ज आज शिल्लक राहिले आहेत. तर ९ अर्ज मागे घेतले सरपंच पदासाठी ४ उमेदवारांचे ४ अर्ज शिल्लक आहेत. बोपर्डी ग्रामपंचायतच्या ९ सदस्य पदांच्या साठी २० उमेदवारांचे २० अर्ज आज शिल्लक राहिले आहेत. तर २ अर्ज मागे घेतले. सरपंच पदासाठी २ उमेदवारांचे २ अर्ज शिल्लक आहेत. किकली ग्रामपंचायतच्या ९ सदस्य पदांसाठी २० उमेदवारांचे २० अर्ज आज शिल्लक राहिले आहेत. तर ९ अर्ज मागे घेतले सरपंच पदासाठी २ उमेदवारांचे २ अर्ज शिल्लक आहेत. पांडे ग्रामपंचायतच्या ९ सदस्य पदांसाठी २० उमेदवारांचे २० अर्ज आज शिल्लक राहिले आहेत. तर ९ अर्ज मागे घेतले सरपंच पदासाठी २ उमेदवारांचे २ अर्ज शिल्लक आहेत.
काळंगवाडी ग्रामपंचायतच्या ७ सदस्य पदांच्या साठी १६ उमेदवारांचे १७ अर्ज आज शिल्लक राहिले आहेत. तर १४ अर्ज मागे घेतले. सरपंच पदासाठी २ उमेदवारांचे ३ अर्ज शिल्लक आहेत.
गोवेदिगर ग्रामपंचायतच्या ७ सदस्य पदांसाठी १२ उमेदवारांचे १४ अर्ज आज शिल्लक राहिले आहेत. तर ३ अर्ज मागे घेतले. अनुसुचीत जाती स्रिसाठी राखीव सरपंच पदासाठी आम्रपाली सुभाष चव्हाण यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असून केवळ अौपचरिक घोषणा करणे बाकी आहे.