Bhor breaking ! संतोष म्हस्के ! शिंदेवाडीत १८ लाखांचा गुटखा जप्त

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
 पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी तालुका भोर येथे राजगड पोलिसांनी सोमवार दि.१२ अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे एक ट्रक,२ टेम्पो ताब्यात घेऊन वाहनांमधील सुमारे १८ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी राजगड पोलिसात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करणारा २ टेम्पो तसेच एक ट्रक शिंदेवाडी परिसरात थांबला असल्याची खबर मिळाल्याने पोलिसांनी टिहणी करून अवैधरीत्या वाहतूक करणाऱ वाहनांवर छापा टाकला असता दोन्ही वाहनांमध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आल्याने कारवाई करून अन्वर शरफुद्दीन शेख (वय ३५, रा. गंजपेठ, पुणे), शेरा रमझान खान ( वय ३०, रा. मध्यप्रदेश), रफिक शेख (रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) आणि मयूर अग्रवाल (रा. पुणे), अशी चार जणांवर गुन्हा दाखल केल.याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे हे करत आहेत.
                                    संतोष म्हस्के
To Top