सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
समाजामध्ये बदल घडविण्यासाठी भक्ती मार्गात जाऊन भजन,कीर्तन,ध्यान,योगा करून सांप्रदायिक अध्यात्मिकतेला सत्संगाची जोड देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आर्ट ऑफ लिविंगच्या सीनियर प्रशिक्षक रेश्मा परब यांनी केले.
आर्ट ऑफ लिविंग आध्यात्मिक संस्थेच्या माध्यमातून गुरुदेव परमपूज्य श्री रविशंकरजी यांचे महाराष्ट्रात आगमनानिमित्त भक्ती की लहर अंतर्गत नेरे ता.भोर येथे सोमवार दि.१२ गुरुपूजा, सत्संग आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी परब बोलत होत्या.तर समाजामध्ये बदल घडण्यासाठी सत्संगाचे कार्यक्रम होण्याची गावोगावी खूप गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले.यावेळी प्रा.गोपाळ उभे,ग्रामपंचायत सदस्य अनिता शेलार,योगिता म्हस्के, रमा सावले, वैशाली मरगजे ,रेश्मा म्हस्के,सुरज सावले,गणेश उभे,सोनू सावले, ओंकार सावले, आकाश बढे ,सागर बढे आदींसह शेकडो चिमुकले व ग्रामस्थ उपस्थित होते.