सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
भोर : संतोष म्हस्के
भोर राजवाडा चौक येथे सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानकारक भाष्य करत अपमान केला तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी अपमानास्पद व अवमान कारक भाष्य केले त्याच्या निषेधार्थ भोर तालुक्यातील समस्त आंबेडकरी संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन सोमवार दि.१३ करण्यात आले. सदर बाबतचे निवेदन नायब तहसीलदार यांना दिले.
सदर निषेध मोर्चाची सुरुवात दिक्षाभूमी स्मारक येथून घोषणा देत करण्यात आली व तहसिलदार कार्यालय समोर येऊन विविध आंबेडकरी चळवळीतील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निषेधपर भाषणे करून व्यक्त केला.यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा भोर तालुका अध्यक्ष रामचंद्र रणखांबे, सचिव रुपेश जाधव, अविनाश गायकवाड, शंकर भालेराव, भीम आर्मी अध्यक्ष महेंद्र साळुंके, विनोद गायकवाड, रिपब्लिकन पार्टी (आ.गट) चे अध्यक्ष सुनिल गायकवाड, युवक अध्यक्ष स्वप्निल सावंत, युवक जिल्हा अध्यक्ष प्रविण ओव्हाळ, श्रमिक आघाडी अध्यक्ष प्रदीप कांबळे, रिपब्लिकन सेनाचे विधानसभा अध्यक्ष किशोर अमोलीक, रपब्लिकन एकतावादी अध्यक्ष नवनाथ कदम, आनंदा सातपुते, प्रकाश गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अमर माने, काँग्रेस मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष राजन घोडेस्वार, दिक्षाभूमी स्मारक समिती चे शंकर माने, मनोहर मोरे, सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे, तेजस मोरे, सकेत सावंत, डॉ राजेश धिवार, यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.